ETV Bharat / city

Disha Salian Case : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे ( Nitesh Rane pre arrest bail ) यांच्याविरोधात दिशा सालियनच्या ( Disha Salian Case ) आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायालयाने निकाल देताना काही अटी व शर्तीसह राणे पिता-पुत्राला अटकपूर्व जामीन मंजूर ( Narayan Rane pre arrest bail granted ) केला आहे.

Narayan Rane pre arrest bail dindoshi court
अटक पूर्व जामीन मंजूर नारायण राणे
author img

By

Published : Mar 16, 2022, 12:12 PM IST

Updated : Mar 16, 2022, 2:42 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे ( Nitesh Rane pre arrest bail ) यांच्याविरोधात दिशा सालियनच्या ( Disha Salian Case ) आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायालयाने निकाल देताना काही अटी व शर्तीसह राणे पिता-पुत्राला अटकपूर्व जामीन मंजूर केला ( Narayan Rane pre arrest bail granted ) आहे. त्यामुळे, राणे कुटुंबीयांना हा मोठा दिलासा आहे. न्यायमूर्ती एस.यू. बघेले यांनी हा निर्णय दिला.

माहिती देताना नारायण राणे यांचे वकील

हेही वाचा - फळांच्या राजासाठी सामान्यांना करावी लागणार एक महिन्याची प्रतीक्षा

युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता

नारायण राणे ( Narayan Rane pre arrest bail ) आणि नितेश राणे ( Dindoshi court Nitesh Rane pre arrest bail ) यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने यापूर्वीच अंतरिम दिलासा दिला होता. कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणावर रितसर सुनावणी सुरू होती. मंगळवारी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज यावर निकाल देत राणे पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, त्याआधी नारायण राणे यांच्यावतीने त्यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी, तर मुंबई मालवणी पोलिसांच्या वतीने डीसीपी विशाल ठाकूर यांनी न्यायालयात बाजू मांडली.

  • Sessions Court granted anticipatory bail to Union Min Narayan Rane & Nitesh Rane in a case registered by Malwani PS, Mumbai in relation to a PC in connection with Disha Salian's death. The bail was granted on a surety of Rs 15,000 & on condition to not tamper with witnesses/probe

    — ANI (@ANI) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण?

दिशा सालियानची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी, अशी विनंती सालियान कुटुंबीयांनी वारंवार केल्यानंतरही केंद्रीय लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे हे या प्रकरणाचा आधार घेत सातत्याने टिका करत होते. दिशा सालियानवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, ती गरोदर होती, असा नारायण राणेंचा दावा होता.

माहिती देताना अ‍ॅड. प्रदीप घरत

नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियानप्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियानची हत्या झाल्याचे सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे, आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या शिवविच्छेदन अहवालामध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून, मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता.

मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशाच्या आई - वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी आणि बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच, दिशाबद्दल समाजमाध्यमांवर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी, अशी तक्रार दिशाची आई वसंती आणि वडील सतीश सालियान यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली होती. यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच, कार्यवाही अहवाल सादर करण्यास सांगितले.

पोलिसांना यासाठी पाहिजे होती राणे पिता - पुत्राची कोठडी

मालवणी पोलीस स्टेशनमध्ये सालियानच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर राणे पिता - पुत्रांची 4 तास चौकशी करण्यात आली. मात्र राणे यांच्याकडून कुठलीही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. राणे पितापुत्रांनी कोणत्या आधारावर आरोप केले आहे, त्यांच्याकडे काय सबळ पुरावे आहे, ते सादर करण्याचे सांगितल्यानंतर देखील त्यांनी कुठलेही पुरावे दिले नाही. राणे पिता-पुत्र चौकशीला सहकार्य करत नसल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून या सर्व प्रकरणाची माहिती घेण्याकरिता राणे पिता-पुत्रांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची माहिती पोलिसांकडून आज दिंडोशी सत्र न्यायालयात देण्यात आली आहे.

राणेंचे नेमके ट्विट काय?

याप्रकरणी नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच. सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली, त्यांचीही चौकशी परत होईल, एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार? असे ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते.

८ जून २०२० रोजी दिशाचा मृत्यू झाला

दिशा सालियान हिने ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सहा दिवसांनंतर, अभिनेता सुशांत सिंग राजपूत उपनगरातील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता.

हेही वाचा - Appeal of Municipal Corporation : उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी दुपारी 12 ते तीन या वेळात घराबाहेर जाणे टाळा

Last Updated : Mar 16, 2022, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.