ETV Bharat / city

Mosque Loudspeaker Controversy : 'मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावर राज ठाकरेंसह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार'

author img

By

Published : Apr 20, 2022, 3:21 PM IST

Updated : Apr 20, 2022, 4:36 PM IST

मशिदीवरील भोंग्यांच्या व सुरक्षेच्या मुद्यावर सर्व राजकीय ( Dilip Walse Patil Will Hold Meeting between All Party Leader ) पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनाही बोलवणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ ( Rajnish Sheth ) आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांच्यात भोंग्याच्या नियमावलीबाबत ( Rule For mosque Loudspeakers ) महत्त्वाची बैठक घेणार आहे.

Mosque Loudspeaker Dispute
Mosque Loudspeaker Dispute

मुंबई - राज्यात सध्या भोंग्यावरून ( Mosque Loudspeakers Issue ) राजकीय वातावरण तापलेले असताना गृहमंत्र्यांनी मुंबईत पोलिस महासंचालकांची बैठक ( Meeting Between Home Minister And DGP ) घेतली. या बैठकीनंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर काय पावले उचलली गेली आहेत, त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात या संदर्भामध्ये कशा पद्धतीच नियोजन करण्यात आले आहे. याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. तसेच या संदर्भामध्ये सर्व राजकीय ( Dilip Walse Patil Will Hold Meeting between All Party Leader ) नेत्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली जाणार असून यामध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना सुद्धा आमंत्रित केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

सुरक्षेबाबत घेतला आढावा - याप्रसंगी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, सध्या राज्यात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा मीटिंग घ्यायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी काल मीटिंग घेतली. त्या मिटिंग मधला आढावा त्यांनी दिला. पुढच्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू शकते व या संदर्भामध्ये काय उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून काय तयारी केली, याबाबतचा आढावा त्यांनी मला दिलेला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे व ती जबाबदारी आमच्यावर आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीरपणे घेत आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. संघर्ष काढू नका, तेढ निर्माण करू नका आणि अशा प्रकारची कृती कोणाकडूनही झाली, तर त्या संदर्भांमध्ये कठोर पद्धतीने कारवाई केली जाईल, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

भोंग्याबाबत राज्य सरकारचाही जीआर - मशिदीवरील भोंग्याबाबत बोलताना ते म्हणाले की, आता हा प्रश्न निर्माण झालेला पण तो काही नवीन नाही आहे. याअगोदर सुप्रीम कोर्टचा २००५चा जजमेंट आहे. २०१५ व २०१७ साली राज्य सरकारने यासंदर्भात जीआर काढला व लाऊड स्पीकरच्या संदर्भातली जी पद्धत आहे, ती पद्धत ठरवून दिलेली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भांमध्ये सूचना संबंधितांना देण्यात येतील. परंतु या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी राज्यातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. काही संघटनांनादेखील बैठकीला बोलावून त्यांच्या सोबत सुद्धा चर्चा करणार आहे. मग याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा आमंत्रित केलं जाणार आहे असं गृहमंत्री म्हणाले.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी परिस्थिती बघून निर्णय? - भोंग्याच्या डेसिबल बद्दल बोलताना ते म्हणाले, या संदर्भामध्ये काही लोकांनी जर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा करण्याचे ठरवले असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू. राज ठाकरे यांच्य औरंगाबादमधील सभेविषयी बोलताना ते म्हणाले की, अशा प्रकारचे निवेदन औरंगाबादच्या पोलीस आयुक्त यांच्याकडे आलेले आहे. पोलीस आयुक्त स्थानिक परिस्थिती पाहून त्याबाबतचा निर्णय योग्य वेळेला घेतील. तसेच मंदिरामध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी लावण्याचा संदर्भामध्ये कोणी सूचना दिलेल्या नाही आहेत. त्यासंदर्भात मंदिरात स्वेच्छेने सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले असतील आणि बाकीच्या ग्राहकांना सुध्दा कोणाला लावायचे असतील, तर त्याला सरकारचा विरोध असण्याचे काही कारण नाही. ज्याने त्याने आपापल्या इच्छेप्रमाणे निर्णय करावा, असेही गृहमंत्री म्हणाले. तसेच आपल्या राज्यामध्ये आणि देशांमध्ये अनेक प्रकारच्या संघटना आहेत आणि या संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आपला अजेंडा घेऊन पुढे जात असतात. तर ज्या पद्धतीने ध्रुवीकरण करण्याचं काम सुरू आहे, त्या पद्धतीने या संघटना काम करतात, असेही ते म्हणाले.

'राणा दाम्पत्याला महत्त्व द्यायची गरज नाही' - राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या बरोबर झालेल्या भेटीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करण्यावरून आव्हान केल होतं. मला वाटत त्याला थोडं महत्त्व द्यायची गरज नाही. आता कोण काय म्हणेल, कोण काय म्हणाले, तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही. त्याच्या संदर्भामध्ये पोलीस तपास करत आहेत, असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

हेही वाचा - Jahangirpuri Violence Video : जहांगीरपुरी अतिक्रमण 'जैसे थे' ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; घटनास्थळावरून प्रतिनिधीने घेतला आढावा

Last Updated : Apr 20, 2022, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.