ETV Bharat / city

Action Against Nana Patole : नाना पटोले यांच्यावर कारवाई केली जाईल - गृहमंत्री पाटील यांचे आश्वासन! - Action Against Nana Patole

मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा ( Mumbai BJP president Mangal Prabhat Lodha ) यांनी नाना पटोले यांच्यावर कारवाईसाठी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना निवेदन दिले होते. आता गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil order on Patole statement ) यांनी पोलीस आयुक्तांना पटोले यांच्यावर आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नाना पटोले मंगलप्रभात लोढा
नाना पटोले मंगलप्रभात लोढा
author img

By

Published : Mar 28, 2022, 4:12 PM IST

मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole in trouble ) यांच्या अडचणीत वाढ होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यबद्दल अपशब्द वापरल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रार ( BJP complaint against Nana Patole ) केली होती. या तक्रारीनुसार पोलीस विभागाला कारवाईचे आदेश देण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

कारवाई करण्याचे दिले आदेश...

मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा ( Mumbai BJP president Mangal Prabhat Lodha ) यांनी नाना पटोले यांच्यावर कारवाईसाठी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना निवेदन दिले होते. आता गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil order on Patole statement ) यांनी पोलीस आयुक्तांना पटोले यांच्यावर आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा-Satej Patil on Chandrakant Patil : चहावर कोल्हापूरची झणझणीत मिसळ भारी पडणार : सतेज पाटील

नाना पटोले यांनी पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरले होते?
महाराष्ट्रात मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उपोषण केले होते. लोढा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करून मारण्याची भाषा वापरल्या प्रकरणी नाना पटोले यांच्या अटकेची मागणी लोढा यांनी केली होती. पटोले यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लोढा उपोषणावर गेले होते. त्यात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या संदर्भात भाजप नेत्यांनी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन नाना पटोले यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा-Sharad Pawar on Kashmir Files : काश्मीर फाईल्सवरुन शरद पवारांची भाजपवर टीका; म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.