ETV Bharat / city

Naxals killed in Gadchiroli : मिलिंद तेलतुंबडे यांच्या मृतदेहाची ओळख पटली - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - Gadchiroli SP Ankit Goel

ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये(Naxals killed in encounter in Gadchiroli forest) चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी(26 Naxals killed) ठार झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल(Gadchiroli SP Ankit Goel) यांनी दिली आहे. मृतांमध्ये तेलतुंबडेचाही समावेश आहे का? हे पोलीस तपासात होते. आता मिलिंद तेलतुंबडे याच्या मृतदेहाची ओळख पटली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil
author img

By

Published : Nov 14, 2021, 1:06 PM IST

Updated : Nov 14, 2021, 2:21 PM IST

मुंबई - गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांचे दोन मोठे नेते ठार (Naxals killed in Gadchiroli)झाल्याचे वृत्त होते. या मृतांमध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश असल्याची चर्चा होती. मृतांमध्ये तेलतुंबडेचाही समावेश आहे का? हे पोलीस तपासात होते. आता मिलिंद तेलतुंबडे याच्या मृतदेहाची ओळख पटली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पत्रकार परिषद -
26 जणांच्या मृतदेहापैकी एक मिलिंद तेलतुंबडे याचा मृतदेह आहे. मिलिंद तेलतुंबडेची ओळख पटली असून तेलतुंबडे ठार झाला आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Gadchiroli SP Ankit Goel) 5 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचेही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.

तेलतुंबडे यादीत 15 व्या क्रमांकावर -
ठार झालेल्या 26 नक्सलवाद्यांपैकी (26 Naxals killed) काही जणांची ओळख पटली असून मिलिंद तेलतुंबडे याचा बॉडीगार्डही चकमकीत ठार झाला आहे. ठार झालेल्यांच्या यादीत तेलतुंबडेचेही नाव असून तेलतुंबडे वर 50 लाखाचे इनाम सुद्धा ठेवण्यात आले होते. यादीत 15 व्या नंबरवर तेलतुंबडे याच नाव, जिवा उर्फ दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे या नावानेही तो ओळखला जायचा.

कोण आहे मिलिंद तेलतुंबडे ?

माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेची देशभरातील नक्षलवादी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास या नावाने ओळख असलेला हा माओवादी नेता गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत ठार झाला आहे. समाजाच्या काही घटकांमध्ये हिंसक विचारसरणी पेरुन नक्षल भरती करण्यात त्याचा मोठा हात होता. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा मृत्यू झाल्याने नक्षलवाद्यांसाठी हा मोठा झटका असणार आहे.मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता उर्फ कविता ही बीएस्‌सी (मायक्रोबायॉलॉजी), एम्‌एस्‌सी (झुऑलॉजी), एम्‌ए (सोशॉलॉजी) आणि बीएड अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.

Last Updated : Nov 14, 2021, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.