मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. धारावीमधील कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी पालिकेने ट्रेसिंग आणि क्वारंटाईन करण्यावर भर दिला. फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले. आजमितीस धारावीतील कोरोना रुग्णसंख्या अत्यंत कमी झाली आहे.
काय आहे धारावी पॅटर्न आणि कशा प्रकारे तो राबवले गेला, याबाबत किरण दिघावकर यांच्यासोबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने खास बातचित केली आहे.
हेही वाचा... कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना सरकारी निवासस्थानात राहण्याची मुभा - गृहमंत्री
आशियातील सर्वात मोठ्या या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. हे यश मिळवून देण्यात जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त (असिस्टंट कमिशनर) किरण दिघावकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी राबवलेल्या धारावी पॅटर्नची चर्चा आज देशभरात केली जात आहे. आज हाच धारावी पॅटर्न दिल्लीमध्ये राबण्याची चर्चा सुरू आहे.
धारावीतील या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार राहतात. झोपडपट्टीत लोकांची लोकसंख्या म्हणाल तर दहा लाखांपेक्षा अधिक असे सांगितले जाते. लाखापेक्षा अधिक झोपडपट्ट्या याठिकाणी आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हापासून राज्यात आला तेव्हापासून धारावीत कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फिजिकल डिस्टन्सिंग नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे त्या करणेही शक्य नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढतच होता. परंतु पालिकेच्या फेवर क्लिनिक आणि निजर्तुंकीकरण फवारणीमुळे तसेच या ठिकाणी कामगार आणि चाकरमानी चार लाखांपेक्षा अधिक आपल्या गावी गेले, त्यामुळे वस्त्यांमध्ये गर्दी नसल्याने योग्य उपाययोजना पालिकेला व प्रशासनाला करता येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता प्रादुर्भाव कमी होत आहे.
हेही वाचा... स्पेशल : दोन्ही पाय निकामे तरी आर्थिक संकटात उभारी घेत कुटुंबाला सावरले; रिक्षा चालकाची प्रेरणादायी कहाणी