ETV Bharat / city

सीएसटी स्थानकावर हमालांशी गप्पा मारण्यात रमले धनंजय मुंडे - सीएसटी रेल्वे स्थानक

धनंजय मुंडे यांनी लातूरला प्रवासासाठी जात असताना स्थानकावरील हमाल मंडळींशी गप्पा मारल्या. त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत घरी जेवणाचे निमंत्रण दिले.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे
author img

By

Published : Nov 20, 2020, 7:02 AM IST

मुंबई - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे राज्यातील तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जातात. लोकांशी थेट सबंध ठेवण्यात ते अग्रेसर असतात. दरम्यान, राज्याच्या विरोधीपक्षनेते पदी असताना मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्थानकावर ज्या पेटीवर (हमालांचे बसण्याचे एक ठराविक ठिकाण) ९० च्या दशकात गोपीनाथराव मुंडे बसत होते. त्याच पेटीवर प्रवासासाठी निघालेल्या धनंजय मुंडे यांना स्थानकावरील हमाल मंडळीनी बसण्याचा आग्रह केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्याच पेटीवर बसून येथील हमाल मंडळींशी मनमोकळ्या गप्पा केल्या.

  • स्व.मुंडे साहेब मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकावर ज्या पेटीवर बसायचे आज लातूरला प्रवासासाठी जात असताना स्थानकावरील हमाल मंडळींनी त्याच पेटीवर बसण्याचा आग्रह केला.मी पेटीवर बसलो,सर्व बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सर्वांना माझ्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले. pic.twitter.com/F8d1DGCAB5

    — Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंडे यांच्या मनाचा दिलदारपणा

यावेळी धनंजय मुंडे यांनी सीएसटी स्थानकावरील सर्वच हमाल मंडळींना व अन्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांना आपल्या शासकीय निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले. यावेळी सर्वच हमाल मंडळींनी मुंडे यांच्या मनाचा दिलदारपणा अनुभवत कृतज्ञता व्यक्त केली.

हमाल मंडळींचा आग्रह

नेमके झाले असे, धनंजय मुंडे हे लातूर-बीड जिल्हा दौऱ्यासाठी सीएसटी रेल्वे स्थानाकावरुन मुंबई - लातूर एक्सप्रेसने प्रवासासाठी निघाले होते. रेल्वे निघायच्या काही मिनीटे आधी ते सीएसटी स्थानकावर आले. येथील हमाल मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे विरोधीपक्षनेते पदी असताना वेटिंग रूम मधील ज्या पेटीवर बसायचे त्याच पेटीवर धनंजय यांनी पुन्हा बसण्याचा आग्रह केला.

धनंजय मुंडे यांनी मारल्या मनसोक्त गप्पा
धनंजय मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पेटीवर बसून सर्व हमाल मंडळींशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे वजनदार मंत्री आपल्या सोबत बसून मनसोक्त गप्पा मारत असल्याचे पाहून अनेकांना त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. यावेळी धनंजय मुंडे यांनीही सर्वच हमाल मंडळी व अन्य कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय निवासस्थानी जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. सर्वच मंडळी अक्षरश: भारावून गेल्याचे चित्र सीएसटी रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाले.

हेही वाचा- पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणताही हवाई हल्ला झालेला नाही; लष्कराचे स्पष्टीकरण

हेही वाचा- एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण; आधी कन्येलाही झाला होता संसर्ग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.