ETV Bharat / city

दिलासा! झायडस कॅडीलाचे विराफिन औषध 7 दिवसांत रुग्णांना करते बरे; कंपनीचा दावा - antiviral Virafin for COVID 19 patients

अजूनही कोरोनावर हमखास प्रभावी असलेले औषध सापडलेले नाही. इतर आजारावरील औषधाचा वापर उपचारासाठी केला जात आहे. अशावेळी आता झायडस कॅडीला कंपनीने कोरोनावर आपण तयार केलेले विराफीन औषध उपयोगी ठरत असल्याचा दावा केला आहे.

झायडस कॅडीला
झायडस कॅडीला
author img

By

Published : Apr 23, 2021, 10:03 PM IST

मुंबई - संपूर्ण देश मागील वर्षभरापासून कॊरोनाच्या संकटाशी लढत असून दुसरी लाट तर देशात हाहाकार माजवत आहे. अशात भारतीयांनासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. झायडस कॅडीला कंपनी 'विराफीन' औषध कोरोनावर गुणकारी ठरत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे इंजेक्शन असून याचा एकच डोस द्यावा लागत असून यामुळे रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

विराफीन औषधाला डीसीजी आयसीजीआय (ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) ने या औषधाला परवानगी दिली आहे. त्यानुसार लवकरच हे औषध उपचारासाठी बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती डॉ तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

हेही वाचा-जळगावात 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार करणाऱ्या टोळीला अटक; वितरणावरील नियंत्रणाचा प्रशासनाचा दावा फोल

चाचण्या यशस्वी-
कोरोनावर गुणकारी असे औषध तयार करण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. पण अजूनही कोरोनावर हमखास प्रभावी असलेले औषध सापडलेले नाही. इतर आजारावरील औषधाचा वापर उपचारासाठी केला जात आहे. अशावेळी आता झायडस कॅडीला कंपनीने कोरोनावर आपण तयार केलेले विराफीन औषध उपयोगी ठरत असल्याचा दावा केला आहे. देशभरात याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यातही या औषधाच्या 10 चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळेच डीसीजीआयने या औषधाच्या वापराला परवानगी दिल्याचेही डॉ. लहाने यांनी सांगितले आहे. तर सर्व वयोगटातील रुग्णांसाठी हे औषध गुणकारी ठरत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान या औषधामुळे रुग्ण केवळ 7 दिवसांत निगेटिव्ह होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-तिन्ही पक्षाचे नेते माध्यमांपुढे जाऊन केवळ केंद्रावर टीका करतात - देवेंद्र फडणवीस

इतर औषधेही सोबत घ्यावी लागणार
विराफीन औषध रुग्णाला 7 निगेटिव्ह करते. ते सर्व वयोगटातील रुग्णांना देता येते. पण त्याचवेळी सुरू असलेले औषध व उपचार तशीच सुरू ठेवावी लागणार आहेत. त्या औषधामध्ये विराफिनची भर असणार आहे. हे इंजेक्शन असून याचा एकच डोस रुग्णाला द्यावा लागणार आहे, असेही डॉ लहाने यांनी सांगितले आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाला हे औषध देण्यात येणार आहे. दरम्यान आता या औषधाला परवानगी मिळाली आहे. ते प्रत्यक्षात कधी उपलब्ध होते आणि ते रुग्णांना कधी देता येते हे पाहणे महत्वाचे आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशाच परिस्थितीत रेमडेसिवीरच इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.