ETV Bharat / city

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दुसऱ्या दिवशीही भाविकांची गर्दी - mumbai ganesh festival

बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून भाविक येत असून 5 किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशीही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

लालबागचा राजा
author img

By

Published : Sep 3, 2019, 12:49 PM IST

मुंबई - लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. बाप्पाच्या आगमनाबरोबर राज्यात पावसालाही सुरुवात झाली आहे. मुंबईत देखील सोमवारपासून पाऊस पडत असला तरी देखील भर पावसात भाविक लालबाग व परेल येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

हेही वाचा - आज दुपारी समुद्राला मोठी भरती, विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी काळजी घ्यावी

बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून भाविक येत असून 5 किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशीही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. पहाटे आरतीच्या वेळेस दर्शन थांबविण्यात आले होते. आरती झाल्यानंतर पुन्हा दर्शन सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबई : यंदा गणपती सजावटीच्या साहित्य विक्रीत घट

दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. अनेक जण या राजाची एक झलक घेण्यासाठी आतूर असतात. यावर्षी लालबागच्या राजाच्या देखाव्यात चांद्रयान-२ आणि अंतराळवीर बघायला मिळत आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच काही कलाकार मंडळींनी दर्शन घेतले. आज देखील सामान्य लोकांपासून ते राजकीय मंडळी, कलाकार मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा - येत्या निवडणुकीत 240 चा टप्पा पार करू, गिरीश महाजन यांचा विश्वास

Intro:दुसऱ्या दिवशीही भाविकांची मोठ्या संख्येने लालबाग दर्शनासाठी

संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. २ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा गणेशोत्सव १२ सप्टेंबरला बाप्पाच्या विसर्जनानंतर संपेल. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी काल सकाळपासूनच मोठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. बाप्पाचा आगमनाने राज्यात पावसाळा ही सुरुवात झाली आहे मुंबईत देखील कालपासून पाऊस पडतोय तरी देखील भर पावसात भाविक लालबाग व परेल येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

बाप्पाचा दर्शनासाठी लोकं देशातून विविध ठिकाणाहून येत आहेत.5 किमी इतक्या रांगा लागल्या आहेत .आज दुसऱ्या दिवशीही सलग रांगा लागल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशी देखील पाहटे आरती झाली यावेळेस दर्शन थांबविले होते .आरती झाल्यानंतर पुन्हा दर्शन सुरू करण्यात आले आहे.

दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. अनेक जण या राजाची एक झलक घेण्यासाठी आतूर असतात.त्यामध्येच यावर्षी लालबागच्या राजाच्या देखाव्यात चांद्रयान -२ आणि अंतराळवीर बघायला मिळत आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ,शिवसेना पक्षप्रमुख तसेच काही कलाकार मंडळींनी दर्शन घेतल्याचे पाहायला मिळाले .आज दुसरा दिवस असल्याने आज देखील सामान्य लोकांपासून ते राजकीय मंडळी ,कलाकार मंडळी बापाचा दर्शनासाठी येताना पाहायला मिळणार आहेत.Body:या बातमीला लालबाग राजा गणपती लाईव्ह लिंक किंवा पाठवलेला विडिओ लागेल तेवढा घ्या सौजन्य लालबाग राजा मंडळConclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.