ETV Bharat / city

'बकरी ईद' स्पेशल : देवनार पशुवधगृहात ११ लाखांपर्यंतचे बकरे विक्रीसाठी उपलब्ध

author img

By

Published : Aug 10, 2019, 8:37 PM IST

'बकरी ईद' निमित्त मुंबई महानगर पालिकेच्या मानखुर्द-देवनार येथील पशुवधगृहात देशभरातून बकरी दाखल झाली आहेत.

'बकरी ईद' निमित्त मुंबई महानगर पालिकेच्या मानखुर्द-देवनार येथील पशुवधगृहात देशभरातून शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्या आहेत.

मुंबई - 'बकरी ईद' निमित्त मुंबई महानगर पालिकेच्या मानखुर्द-देवनार येथील पशुवधगृहात देशभरातून शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्या आहेत. या वर्षी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक बकरी तसेच जवळपास १० हजारांपेक्षा अधिक मोठी जनावरे पशुवधगृहात येणार असल्याचा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. बकरी ईदच्या कुर्बानीसाठी १० हजारांपासून ११ लाख ७८६ रुपयांचे बकरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

'बकरी ईद' निमित्त मुंबई महानगर पालिकेच्या मानखुर्द-देवनार येथील पशुवधगृहात देशभरातून बकरी दाखल झाली आहेत.

बकऱ्याची कुर्बानी देण्यासाठी मुस्लीम धर्मीयांकडून मुंबईत पालिकेच्या देवनार येथील पशुवधगृहात बकरे आणि मोठी जनावरे लिलावासाठी आणली जातात. सध्या पशुवधगृहात १० हजारांपासून ११ लाख ७८६ रुपयांचे बकरे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या बकऱ्यांच्या शरीरावर मुस्लीम धर्मीयांमध्ये पवित्र अशी अक्षरे आणि खुणा आहेत.

येत्या रविवारी (दि.११ ऑगस्ट) आणि सोमवारी (दि.१२ऑगस्ट) ला बकरी ईदनिमित्त या बकऱ्यांच्या खरेदीसाठी मुस्लीम धर्मीय मोठ्या संख्येने पशुवधगृहात येतात. त्यासाठी पालिका आणि पशुवधगृह सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Intro:मुंबई - 'बकरी ईद' सणासाठी मुंबई महानगर पालिकेचे मानखुर्द देवनार येथील पशुवधगृह सज्ज झाले आहे. या सणासाठी देशभरातून शेळ्या-मेंढ्या देवनार पशुवधगृहात दाखल झाल्या आहेत. या वर्षी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक शेळ्या मेंढ्या, तर साधारणपणे १० हजारांपेक्षा अधिक मोठी जनावरे पशुवधगृहात येतील असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान बकरी ईदच्या कुर्बाणीसाठी १० हजारांपासून ११ लाख ७८६ रुपयांचे बकरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Body:मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईद सणाला विशेष असे महत्व आहे. हजरत इब्राहिम यांना देवाने आपल्या मुलाचा बळी देण्यास सांगितले. देवाने सांगितले असल्याने तेही ही गोष्ट करण्यास तयार झाले होते. या मुलाचे नाव इस्माईल असे होते. पोटचा मुलगा असल्याने इब्राहिम यांना तो अतिशय लाडका होता. पण देवाचा आदेश पाळणे गरजेचे असल्याने त्यांनी ही अतिशय कठीण गोष्ट मान्य केली. आपल्या मुलाचा बळी देण्यास तयार झालेल्या हजरत इब्राहिम यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हातात सुरा देण्यात आला. मात्र त्याचवेळी देवाने त्यांना खुश करायचे ठरवले. आणि प्रत्यक्ष बळी देण्याच्या वेळी मुलाच्या जागी एक बकरा आणून ठेवला. देवाच्या या कृतीमुळे इब्राहिम देवावर खूपच खुश झाला. कारण आपला मुलगा त्याला कायमसाठी मिळणार होता. त्यामुळे तेव्हापासून या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो.

मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांसाठी बकरा कापणे अनिवार्य आहे. यातही हा कापलेला बकरा केवळ आपल्या कुटुंबात वाटून न खाता तो समाजातील गरिब वर्गाला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी गरिबांची विशेष काळजी घेतली जाते. बळी दिलेल्या बकऱ्याचा मांसाचे तीन भाग केले जातात. त्यामध्ये गरिब, गरजवंत आणि स्वत: असे हे मांस वाटले जाते. देवाचा आदेश मानून हा बळी दिला जातो आणि कुटुंबिय एकत्रितपणे त्याचे मांस खातात. बकऱ्याची कुर्बाणी देण्यासाठी मुस्लिम धर्मीयांकडून मुंबईत पालिकेच्या देवनार येथील पशुवध गृहात बकरे आणि मोठी जनावरे आणली जातात. ज्याची जितकी ऐपत त्याप्रमाणे बकरे खरेदी केले जातात. सध्या पशुवधगृहात १० हजारांपासून ११ लाख ७८६ रुपयांचे बकरे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या बकऱ्यांच्या शरीरावर मुस्लिम धर्मीयांमध्ये पवित्र अशी अक्षरे आणि खुणा आहेत. रविवारी आणि सोमवारी बकरी ईदनिमित्त या बकऱ्यांच्या खरेदीसाठी मुस्लिम धर्मीय मोठ्या संख्येने पशुवधगृहात येतात. त्यासाठी पालिका आणि पशुवधगृह सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.