ETV Bharat / city

अंडरवर्ल्डशी आपला संबंध नाही, फडणवीस यांचे काय संबंध आहेत? ते सर्वांसमोर आणू - नवाब मलिक - Fadnavis underworld relation

"माझा कोणत्याही आरोपीशी संबंध नाही. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडची जवळपास तीन एकर जागा ही माझ्या मालकीची नाही. या कंपनीमध्ये असलेल्या सहा दुकानांची मालकी माझ्याकडे असून ही मालमत्ता खरेदी करताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यावेळी असलेल्या बाजारभावानुसार ही मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काही शंका असल्यास रजिस्ट्रार ऑफिसमध्ये याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत", असे म्हणत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

Nawab Malik Underworld Relations
नबाव मलिक
author img

By

Published : Nov 9, 2021, 2:24 PM IST

Updated : Nov 9, 2021, 6:42 PM IST

मुंबई - "माझा कोणत्याही आरोपीशी संबंध नाही. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडची जवळपास तीन एकर जागा ही माझ्या मालकीची नाही. या कंपनीमध्ये असलेल्या सहा दुकानांची मालकी माझ्याकडे असून ही मालमत्ता खरेदी करताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यावेळी असलेल्या बाजारभावानुसार ही मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काही शंका असल्यास रजिस्ट्रार ऑफिसमध्ये याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत", असे म्हणत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

Nawab Malik Underworld Relations
मालमत्ता पत्रक
Nawab Malik Underworld Relations
नकाशा

आपला अंडरवर्ल्डशी कोणताही संबंध नाही. राजकीय आणि सामाजिक जीवनात आपल्यावर असे कोणतेही आरोप कधीही झालेले नाही, असा खुलासा देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला.

हेही वाचा - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कस्टडीची मुंबई पोलिसांनी केली मगाणी

उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार

पूर्वीपासूनच गोवावाला कंपाउंड या परिसरामध्ये असलेली चार दुकाने आपण भाडेतत्त्वावर घेतली होती. या जागेचे मूळ मालक मुनीरा प्लंबर यांच्याकडून या चारही दुकानांचे मालकी हक्क आणि खरेदी केली. त्यानंतर अजून दोन दुकाने याच परिसरात आम्ही खरेदी केली. ती खरेदी करत असताना बाजार भाव आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही मालमत्ता खरेदी करण्यात आली. तसेच याच परिसरामध्ये रखवालदार म्हणून काम करणारे सरदार खान यांनी तीनशे स्क्वेअर फुट जागा ही आपल्या नावावर केली होती. ही जागा खरेदी करायची असल्यास मूळ मालकाने आपल्याला सरदार खान यांच्यासोबत व्यवहार करायला सांगितला होता. तो व्यवहार आपण कायदेशीररित्या केला. सरदार खान हे शहा वली खान यांचे वडील असून बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात शहा वली खान आरोपी आहेत, हे सर्व जगाला ठाऊक आहे. मात्र, त्या मालमत्तेचा कोणताही वाद नव्हता किंवा त्या मालमत्तेसंबंधी खरेदी - विक्रीबाबत कोणताही अडथळा नव्हता. त्यामुळे, कायदेशीररीत्या तीनशे स्क्वेअर फुट जागेचा व्यवहार करण्यात आला. मात्र, देवेंद्र फडणवीस करत असलेले आरोप हे पूर्णपणे खोटे असून याबाबत आपण उद्या घेणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये अजून पुरावे सादर करू. तसेच, अंडरवर्ल्डसोबत देवेंद्र फडणवीस यांचे काय संबंध आहेत? ते सर्वांसमोर आणू, असा इशारा नवाब मलिक यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून दिला. तसेच, दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडू, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही धमाका केला नाही. मात्र, मी उद्या पत्रकार परिषद घेऊन हायड्रोजन बॉम्ब फोडेल, असा इशारा दिला आहे.

सनातन संस्थेकडून दारूच्या मालमत्तेची खरेदी

निव्वळ मालमत्ता खरेदी झाल्याने अंडरवर्ल्डशी संबंध येत असेल, असा समज जर देवेंद्र फडणवीस यांचा असेल तर, कोकणातील दाऊद इब्राहिम याचे घर सनातन संस्थेने खरेदी केले, मग त्याचा काही संबंध अंडरवर्ल्डशी देवेंद्र फडणवीस जोडणार का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. तसेच, उद्या होणार्‍या पत्रकार परिषदेतून भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबई मधील कोण - कोणते प्लॉट बेकायदेशीररित्या खरेदी करतात, याचाही खुलासा करू, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा - Fadnavis Vs Malik : देवेंद्र फडणवीस-नवाब मलिकांमध्ये 'वाकयुद्ध'; पाहा कोण काय म्हणाले?

Last Updated : Nov 9, 2021, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.