मुंबई - विधान परिषद निवडणुकीत आपले बहूमुल्य मत देण्यासाठी कॅन्सरसारख्या दुर्धर ( Devendra Fadnavis welcomed MLA Mukta Tilak ) आजाराशी लढा देत असतानाही विधानभवनात पोहचलेल्या भाजपच्या कसबा पेठ येथील आमदार मुक्ता टिळक यांचे स्वागत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे उमेदवार राम शिंदे, प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.
हेही वाचा - Bhai Jagtap on vidhan parishad election : खूप खालच्या दर्जाचे राजकारण केलं जातंय - काँग्रेस नेते भाई जगताप
आतापर्यंत १३५ जणांनी मतदानाचा अधिकार बजावला असून भाजपच्या पुण्याच्या कासबा पेठ येथील आमदार मुक्ता टिळक या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधान भवनात पोहचल्या आहेत. विशेष करून मागील बऱ्याच कालावधीपासून त्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत आहेत. मागे १० जूनला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सुद्धा त्या विधानभवनात पोहचल्या होत्या. त्या दरम्यान विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यांचे स्वागत केले होते. आजही त्यांचे बहुमूल्य मत देण्यासाठी त्या विधानभवनात पोहचल्या तेव्हा त्यांच्या आमदार सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तर, दुसरीकडे लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार हे सुद्धा आजारी असून मतदानासाठी विधान भवनात पोहचणार आहेत. ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
विधान परिषदेचे आज मतदान असून सर्व पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यात भाजप देखील मागे नाही. पक्षाने दिलेले आदेश मानायचे हे पहिल्यापासून आमच्या रक्तात आहे. त्यामुळे मी आज पक्षाच्या मतदानासाठी जात आहे, असे मुक्ता टिळक म्हणाल्या होत्या.
हेही वाचा - मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी नवाब मलिक अन् अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव