ETV Bharat / city

उद्धव ठाकरेंच्या इगोसाठी जनतेचे हजारो कोटी वाया घालवणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका - Kanjurmarg Car Shed

कांजूरमार्गमधील कारशेड रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे. उद्धव ठाकरे यांनी केवळ अहंकारापोटीच आरे ऐवजी कांजूरमार्गमध्ये आरे प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला होता, अशी टीका देवेंद्र फडणवीस s यांनी केली आहे. ठाकरे यांनी नेमलेल्या या समितीनेही कांजूरला कारशेड स्थापन करणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट केलं. हा मार्ग कांजूरमार्गमध्ये नेल्यास त्याच्याd उभारणीत जनतेचा प्रचंड खर्च वाढेल. त्यामुळे यांच्या इगोसाठी जनतेचे हजारो कोटी वाया जाऊ देणार नाही.

Deputy CM Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 12, 2022, 8:30 AM IST

Updated : Aug 12, 2022, 12:33 PM IST

नागपूर कांजूरमार्गाची जागा मेट्रो थ्रीसाठी ( Metro 3 ) योग्य नाही, तर आरए कारशेडमध्येच ( Aarey Car Shed ) योग्य आहे, असा अहवाल भाजप सरकारच्या काळातील कमिटीने दिला आहे. तोच उद्धव ठाकरे सरकार असतानासुद्धा दिला. पण, केवळ इगोपोटो तो प्रकल्प कांजूरमार्गाला नेण्याचे काम केले. पण, उद्धव ठाकरे ( Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray ) यांच्या इगोसासाठी जनतेचे हजारो कोटी वाया जाऊ देणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांनी चढवला आहे.

हाय लेव्हल एसी एस सौवनिक अहवाल कांजूरमार्गची जागा मेट्रो थ्रीसाठी योग्य नाही, यासंदर्भात अहवाल भाजपचे सरकार असताना दिला. त्यासोबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नियुक्त केलेल्या हाय लेव्हल एसी एस सौवनिक यांच्या हाय लेवल कमिटीचा तोच अहवाल दिला. त्या अहवालानुसार मेट्रो कारशेड आरेमध्येच योग्य आहे. तो कांजूरमार्गमध्ये नेल्यास त्याच्या उभारणीत जनतेचा प्रचंड खर्च वाढेल. आणि चार वर्षांचा विलंब होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळे तो प्रकल्प कंजूरमार्गला नेण्यात आला होता. पण, त्यांच्या इगोसाठी जनतेचे हजारो कोटी वाया जाऊ देणार नाही, असे म्हणत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणाविस यांनीच निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांची टीका

आरेत एकही झाड कपायची गरज नाही यात आता आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. यातच कारशेडचे 29 टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच एकूण प्रकल्पाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे चार वर्षे विलंब करून पंधरा वीस हजारो कोटीचा खर्च वाढविल्यास हे पैसे जनतेच्या खिशातून जातील. त्यामुळे हे पैसे जनतेचे पैसे असे वाया जाऊ देणार नाही, असे म्हणत ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत टीका केली. कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र, त्याचा वाद असल्याने प्रकरण हायकोर्टात सुरू आहे. त्यावेळी मेट्रो कारशेडची जागा मेट्रो थ्रीकरिता मागितलेली आहे. तर कांजूरमार्गची जागा मेट्रो सहासाठी मागितली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खाते वाटप लवकरच होईल, काळजी करू नका खाते वाटपसंदर्भात लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. तोपर्यंत दिवसभरात अनेक वेळेला खाते वाटप करीत आहात. तुम्हाला बरे आहे. त्यामुळे आम्ही पेपर फोडून टाकला, तर तुम्हाला काम नाही मिळणार, असे मीडियाला संबोधत म्हणालेत.

हेही वाचा Firing in Khar खार परिसरात गॅझेबो शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार

Last Updated : Aug 12, 2022, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.