मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार होण्यास माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis talk to bjp party workers ) यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप यांचे एकत्रित सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्यात देवेंद्र फडणवीस ( Fadnavis talk at Trident Hotel Mumbai ) यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यामुळे, भाजप सत्तेत आली तर भाजपचाच मुख्यमंत्री असेल, असा अंदाज फक्त भाजपमध्येच ( Devendra Fadnavis talk on cm post ) नाही तर इतर राजकीय पक्षांकडून सुद्धा बांधला जात होता. पण, फडणवीस यांनीच राज भवन येथे पत्रकार परिषदेत मोठा राजकीय बॉम्ब टाकत नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, असे घोषित करत सर्वांना मोठा धक्का दिला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत या कारणास्तव भाजपच्या गटात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. ही नाराजी देवेंद्र फडणवीस स्वतः ओळखून आहेत. म्हणून मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत संबोधित करताना नाराज होऊ नका, हे आपलेच सरकार आहे, असा संदेश त्यांनी उपस्थित नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला.
देवेंद्र फडणवीस आमदारांना नेमके काय म्हणाले? - राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या सर्व आमदारांची मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा. अडीच वर्षांत सर्व रखडलेली कामे मार्गी लावू. कोणीही कसलीही काळजी करायचे कारण नाही. हे सरकार आपले आहे. कुणीही नाराज होऊ नका. सर्वांनी आता जनतेसाठी काम करा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस नाराज, नेते नाराज? - याप्रसंगी भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही म्हणून नाराज होवू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून भाजप आमदारांमध्ये नाराजी पसरली का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदी पुन्हा विराजमान होता आले नाही म्हणून ते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांची देहबोली त्याचे उत्तर देत होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कामाचा धडाका? - देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. ते मंत्रालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. संबंधित बैठक ही ओबीसी आरक्षणासंदर्भात होती. ओबीसी आरक्षणासाठी तातडीने कारवाई करावी. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करावे, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. सध्या राज्यात पावसाळ्याला सुरुवात झाली असून त्याबाबत उपाययोजना संदर्भात त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची सुद्धा बैठक घेतली. तसेच, त्यांच्या निवसस्थानी कायदा व सुव्यवस्थेची आढवा बैठकही घेतली.
हेही वाचा - Uddhav in Action : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दणका, शिवसेनेच्या नेते पदावरून उचलबांगडी