ETV Bharat / city

Mumbai BJP Celebration : 'गोव्यातील विजयानंतर आता राज्यातही सत्ताबदल', देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्यं

चार राज्यात भाजपला बहुमत ( Election Victory In Four State ) मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रात 2024ला सत्ता ( Devendra Fadnavis On Maharashtra Government ) बदल अटळ आहे, असे सुतोवाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आज विधानभवनात केले.

Government In Maharashtra
Government In Maharashtra
author img

By

Published : Mar 11, 2022, 1:06 PM IST

मुंबई - चार राज्यात भाजपला बहुमत ( Election Victory In Four State ) मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रात 2024ला सत्ता ( Devendra Fadnavis On Maharashtra Government ) बदल अटळ आहे, असे सुतोवाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आज विधानभवनात केले. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या मुंबई मनपाला ( Devendra Fadnavis On BMC Corruption) येत्या निवडणुकीत बाहेर काढू, ठाम विश्वास ही व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप कार्यालय ते विधानभवन रॅली काढण्यात आली. यानंतर फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -

आजच्या निकालाने आम्ही भारावून गेलो नाही. उलट सर्वसामान्य घटकांसाठी काम करण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. उद्यापासून आम्ही राज्यभरात कामाला लागू, असे फडणवीस म्हणाले. सत्ता परिवर्तन 2024ला अटळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणांचा उल्लेख केला. केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जातो आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत फडणवीस यांना छेडले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही बेकायदेशीर काम करत नाहीत. परंतु काही जण पराचा कावळा करतात, असे फडणवीस यांनी सांगताना 2024 ला राज्यात सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट केले. तसेच मुंबई महानगर पालिका भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली आहे. तिला बाहेर काढण्याचे काम भाजप करेल, असा विश्वास व्यक्त केला.

  • I'd like to congratulate Yogi Ji as 'Bulldozer Baba's' bulldozer worked. BJP workers who went to Uttar Pradesh have increased BJP's glory... you wiped out Samajwadi Party & BJP won again: BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/W4WyscUYUw

    — ANI (@ANI) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिवसेना-राष्ट्रवादीला फडणवीसांनी डिवचले -

पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपने चार ठिकाणी बाजी मारली. अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात तब्बल 273 जागांवर विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात देखील 20 जागा निवडून आणल्या. आजही सामान्य लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे, हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. 37 वर्षात प्रथमच सलग दोन वेळा एकच उत्तर प्रदेशात निवडून आला आहे, असे फडणवीस म्हणाले. शिवसेना-राष्ट्रवादीलादेखील फडणवीस यांनी डिवचले. सिंह गर्जना करुन पहिल्यांदाच नशीब आजमावण्याऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीला साधा भोपळा फोडता आलेला नाही. मुळात उत्तर प्रदेश, गोवा विधानसभा मतदार संघात शिवसेना-राष्ट्रवादीचा लढा आमच्याशी नव्हता, तर तो मतदारांशी सोबत होता. शिवसेनेच्या उमेदवारांना केवळ तीनशे मते पडली, असा चिमटा फडणवीसांनी काढला.

हेही वाचा - Modi On Result : अनेक पंतप्रधान देणाऱ्या उत्तर प्रदेशने प्रथमच मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा पुन्हा संधी दिली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.