मुंबई - कोरोना विषयक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप ( PM Narendra Modi On Petrol Price Hike ) केला. मात्र, महाराष्ट्र राज्य या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देत आहे. तरीही राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे, असे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींना ( CM Uddhav Thackeray Reply PM Narendra Modi ) दिले. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले ( Devendra Fadnavis Reply CM Uddhav Thackeray ) आहे.
काय म्हणाले फडणवीस - ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची 'पोलखोल' करताच तुमचे अरण्यरुदन सुरू. जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो. जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022 आहे. मग, जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का?. शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते. तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का?, याचे उत्तर मिळालेच पाहिजे. दुसरे म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या अवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या, अशी मागणी करत दोषारोप आणि जबाबदारी झटकणे, यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का?, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
-
शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का❓
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या ❗️#Maharashtra
">शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का❓
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2022
याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या ❗️#Maharashtraशेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का❓
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2022
याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या ❗️#Maharashtra
राज्यामुळे पेट्रोल-डिझेल महागले नाही? - संपूर्ण देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त १५ टक्के जीएसटी गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी एकत्र केल्यास महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. तरीही, महाराष्ट्राला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे. तसेच, मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्राचा तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले ही वस्तुस्थिती नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ट्विट करत म्हटले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut On Bhagatsingh Koshyari : राजभवन गुन्हेगारांना संरक्षण कसे देते?, संजय राऊतांचा सवाल