मुंबई - राज्यातील पोलीस दल अधिकपणे सक्षम करण्यासाठी सुमारे २० हजार पदांची भरती करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis on 20 thousand posts ) दिली. गृहखात्याच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वेदांता प्रकल्प, सायबर गुन्हे, नवरात्र आणि दसऱ्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.
एनजीओंचीही मदत घेणार - राज्यात पोलिसांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चादेखील केली आहे. त्यानुसार राज्यात २० हजार पदे ( 20 thousand posts recruitment in police ) भरण्यात येणार आहेत. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात ( police job ad in Maharashtra ) येईल, असे फडणवीस म्हणाले. तुरुंग विभागात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आपल्या तुरुंगांमध्ये असे अनेक कैदी आहेत ज्यांचा जामीन मंजूर झाला आहे, मात्र पैसे किंवा कोणी व्यक्ती नसल्यामुळे ते तुरुंगाबाहेर येऊ शकले नाहीत. अशा कैद्यांना तुरुंगाबाहेर जाता यावे, यासाठी आम्ही एनजीओंचीही मदत घेणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.
गुन्हे सिद्ध होण्याचा दर वाढला पाहिजे- राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या विविध घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सायबर गुन्हेगारी वाढली असून आज सायबर सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. सायबर गुन्हे लवकरात लवकर उघडकीस येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पोलिसांना तसे निर्देश दिले ( Devendra Fadnavis on crime ratio ) आहेत. तसेच एखाद्या घटनेबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे सिद्ध होण्याचा दर वाढला पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
विरोधकांनी शिंदे सरकारला घेरले- वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला घेरले आहे. शिवसेनेकडून राज्यात आंदोलन सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले. वेदांता बद्दल नोटंकी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काळात काहीही झालं नाही. मात्र, आम्ही आता नक्कीच उत्तर देऊ. वेदांता बद्दल आता गुजरातशी चर्चा करण्यात अर्थ नाही. वेगवेगळ्या राज्यात सुरू असलेल्या चांगल्या गोष्टींची माहिती घेतली जात असल्याचे फडणवीस म्हणाले.
वेळेचे बंधन नवरात्रोत्सव विशेषतः दांडिया खेळण्यासाठी असणार- दहीहंडी, गणेशोत्सव जोरात साजरा केल्यानंतर नवरात्रोत्सव जोरात करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र आता वेळेचे बंधन नवरात्रोत्सव विशेषतः दांडिया खेळण्यासाठी असणार आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित गृहविभागाची बैठक झाली. दरम्यान, नवरात्रीत दोन दिवस बारा वाजेपर्यंत आम्ही लोकांना दिले आहे. अजून एक दिवस वाढवला पाहिजे याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवणार आहोत. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे फडणवीस यांनी सांगितले.