मुंबई - कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधत कारशेड हलवलं अहंकारापोटी, आदित्य ठाकरेंना भविष्य आहे अभ्यास करून बोलावं असं म्हटलं आहे.
कारशेड अहंकारापोटी हलवलं, आदित्य ठाकरेंना भविष्य आहे अभ्यास करून बोलावं - देवेंद्र फडणवीस - कांजूरमार्ग कारशेडबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस
मुंबई - कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधत कारशेड हलवलं अहंकारापोटी, आदित्य ठाकरेंना भविष्य आहे अभ्यास करून बोलावं असं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी कालही विधानभवनात कारशेड लवकर झालं पाहिजे, मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण व्हावे. 100 कोटींचे काम आरेमध्ये होऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या अहंकारापोठी कांजूरला करण्याचा निर्णय राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला आणि आज न्यायालयाने चपराक लगावली आहे.मुंबई मेट्रो 2021 साली मेट्रो झाली असती , पण अहकारांपोटी कारशेड हलवलं. मेट्रोला लागणारा पैसा हा कोणाचा स्वतःचा नाही तर हा पैसा मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातील जनतेचा आहे. आदित्य ठाकरे हे युवा नेते आहेत त्यांनी अभ्यास करून बोलावं त्यांना भविष्य आहे, असे फडणवीस म्हणाले.
अजित पवारांना सहकाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासासाठी बोलावं लागत -
पुढे देवेंद्र म्हणाले की, अजित पवार जरी बोलले असले की, भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. हे सहकाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलावं लागत. मी देखील म्हणेन राष्ट्रवादीचे 2 आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमचे 105 आहेत ते तसेच राहणार असून त्यापेक्षा अधिक होऊही शकतात.
आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र हा युवा मोर्चाचा लोकप्रिय उपक्रम आहे -
आज आत्मनिर्भर भारत पुस्तिकेचे अनावरण करताना फडणवीस म्हणाले की, आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्र सरकारने अनेक लोक हिताच्या योजना राबवल्या भविष्यातला भारत कसा असावा, याचा आराखडाही यानिमित्ताने केला आहे. त्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज दिले आहे. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे ती ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, राजकारणाच्या वेळी राजकारण आणि इतर वेळी समाजकारण करणं महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना महाराष्ट्रात योग्यरीत्या राबवल्या जात नाहीत. अनेक योजना आहेत पण महाराष्ट्र यात 17 व्या क्रमांकावर आहे. स्ट्रीट वेंडरसाठी केंद्राची चांगली योजना असूनही राज्य सरकार त्याची योग्य अंमलबजावणी करत नाहीत.

Last Updated : Dec 16, 2020, 3:39 PM IST