ETV Bharat / city

सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली? देवेंद्र फडणवीस कालपासून दिल्लीत - देवेंद्र फडणवीस दिल्ली

शिवसेना नेते, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राजकीय घडामोडींना ( Devendra Fadnavis in Delhi ) वेग आलेला असताना त्यात महत्वाची बातमी समोर आलेली आहे. आपल्या सागर या निवासस्थानी ( Devendra Fadnavis in delhi after shinde rebel ) आढावा घेणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कालपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत.

Devendra Fadnavis in Delhi
देवेंद्र फडणवीस दिल्ली
author img

By

Published : Jun 24, 2022, 9:40 AM IST

मुंबई - शिवसेना नेते, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राजकीय घडामोडींना ( Devendra Fadnavis in Delhi ) वेग आलेला असताना त्यात महत्वाची बातमी समोर आलेली आहे. आपल्या सागर या निवासस्थानी ( Devendra Fadnavis in delhi after shinde rebel ) आढावा घेणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कालपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यामुळे, आता राज्यातील सत्ता स्थापनेचे केंद्रस्थान दिल्ली झाले आहे.

हेही वाचा - Sharad Pawar warning to Rebel : परिणाम भोगावे लागतील.. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पवारांचा दम!

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच दिल्ली गाठली होती. त्यानंतर फडणवीस पुन्हा मुंबईत आले, दोन दिवस इथल्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या, चर्चा केली मग गुरुवारी किरीट सोमय्यांसह इतर नेत्यांसोबत बैठका घेतल्या आणि पुन्हा दिल्ली गाठली. त्यानंतर मोदी व शाह यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या कालपासून फडणवीस दिल्लीत ठाण मांडून आहेत.

एकनाथ शिंदे गटाच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष - विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या ५ आमदारांना निवडून आणणारे व करिष्मा करणारे विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषद निवडणुकीनंतर दिल्लीला गेले होते. त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यामुळे राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडींवर देवेंद्र फडणवीस बारकाईने लक्ष ठेऊन होते. विशेष करून शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंद व त्यांच्या सोबत असलेल्या समर्थकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांनीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

महाराष्ट्रातील सत्तेचा केंद्रबिंदू दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे यांच्या बंडाळीमुळे नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांचा गट भाजप बरोबर हात मिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाला मंत्रिपदाची ऑफर्स देण्यात आलेली आहे. यामध्ये १० कॅबिनेट ५ राज्यमंत्री व २ केंद्रीय मंत्रिपदाचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, याबाबत आता शेवटचा व अंतिम निर्णय घेण्यासाठी, तसेच याबाबत योग्य ती रणनीती आखण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे. दिल्लीमध्ये ते भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, तसेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून भेटत आहे.

हेही वाचा - घसरणीनंतर बिटकॉइन पुन्हा १६ लाखांवर.. इतर क्रिप्टोकरन्सीचे दरही वधारले..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.