ETV Bharat / city

ठाकरे सरकार इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार.. आपल्याकडे 'इनामी' नाही व 'बेनामी'ही नाही, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Amravati Violence

अमरावती, नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार, राज्यात सामुहिक बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

devendra-fadnavis-
devendra-fadnavis-
author img

By

Published : Nov 16, 2021, 8:47 PM IST

मुंबई - भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत समारोप भाषण करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी सुरूवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिशय वेगाने स्वास्थ्य लाभावे व ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. पण दुसऱ्याच क्षणी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रावर विश्वासाहर्तेचे संकट आहे. सर्वात प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितले जातं. पण महाराष्ट्रात सरकार कुठे आहे, असा प्रश्नही त्यांनी यादरम्यान उपस्थित केला.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार..

मुख्यमंत्री स्वतःला मुख्यमंत्री मानत नाहीत. महाराष्ट्रातील जनता होरपळत आहे. या सरकारमध्ये कोणाला काहीच पडलेलं नाही. कोणी राज्याच्या समस्यावर विचार करत नाही. आपल्या सरकारमध्ये समृद्धी महाजलयुक्त शिवार, सर्वांना घर देणे, शेतकरी, महिला अत्याचार या विविध विषयांवर चर्चा व्हायची. परंतु आताची चर्चा हर्बल तंबाखू, वसुली, खंडणी, बलात्कार यावरच होत आहे. महाराष्ट्रातील इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून ठाकरे सरकारचे नाव लिहिले जाईल असेही देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले. महाराष्ट्रात आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत त्यांच्या प्रेस नोटमध्ये हजारो कोटी रुपयांच्या दलालीचे प्रकार समोर आले आहेत. पण सामान्य शेतकऱ्याकडे बघायला या सरकारला वेळ नाही, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

आता लढाई रस्त्यावरची..

आता एल्गार करून रस्त्यावर उतरावे लागेल. आता कोरोनाचं कारण चालणार नाही. राजकीय गुन्हेगारीकरण होत आहे. देशद्रोही लोकांसोबत पार्टनरशिप केली जात आहे. त्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. अवैध रेती, अवैद्य दारू यांचे एकमेव काम सुरू असून, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो, अशी अवस्था झाली आहे. फडणवीस म्हणाले कोटी कोटी रुपये देऊन पोलिस अधिकारी पदावर येत असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते. ही लढाई आता समोरून लढावी लागेल. ती पूर्ण ताकतीने. आपल्याला घाबरण्याचे कारण नाही आपल्याकडे इनामी ही नाही व बेइमानी ही नाही. मी माजी मुख्यमंत्री असून मुंबईत माझं घर नाही. येथे भ्रष्ट लोक आहेत व आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई लढावी लागणार आहे. नाहीतर काळ आपल्याला माफ करणार नाही. नांदेड, अमरावती, मालेगाव मधील घटना एक प्रयोग आहे. अल्पसंख्याक यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. २६ ऑक्टोबरला बांगलादेशात दंगली होतात त्याचं समर्थन करायला त्रिपुरामध्ये रॅली होते. चुकीचे फोटो दाखवून भावना भडकावण्याचा प्रयत्न होतो. पाकिस्तानमधील प्रकल्पाचे फोटो त्रिपुराचे फोटो म्हणून दाखवले जातात. राहुल गांधी यांना पूर्ण कल्पना असतानाही ८ नोव्हेंबरला राहुल गांधी यांनी ट्विट करत त्रिपुरा मध्ये मुसलमान यांच्यावर आत्याचार झाला असे सांगितले. हजारो लोक एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे कसे काय काढू शकतात. याची माहिती सरकारला नाही का? सरकारच्या समर्थनाशिवाय हे मोर्चे निघू शकत नाहीत, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर लावला आहे.

काय होतास तू काय झालास तू -

संजय राऊत यांचं देवेंद्र फडवणीस यांना आश्चर्य वाटतं. कोण होतास तू काय झालास तू? असं सांगत संजय राऊत, नवाब मलिक यांच्या वर देवेंद्र फडणीस यांनी टीका केली आहे. अमरावती एसआरपीएफच्या सात कंपन्या होत्या. पण त्यांना आदेश दिले नाहीत. जेव्हा आदेश दिले तेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले. पाच जवान गंभीर जखमी झाले पण कोणालाही अटक झाली नाही. हा पॅटर्न समजून घ्या. मोदींच्या विकासाला उत्तर देता येत नाही तेव्हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करुन असा प्रयत्न चालू आहे. भाजपचा कार्यकर्ता कधीच दंगल करणार नाही पण आमच्या अंगावर कोणी आले तर सोडणार नाही, असेही देवेंद्र फडणीस यांनी म्हटले.

हरलो तरी चालेल काँग्रेसशी हातमिळवणी नाही -

हे सरकार आता जनाब बाळासाहेब ठाकरे सरकार झालं आहे. मुंबई महानगरपालिकेची चिंता यांना सतावत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यावर लक्ष ठेवून आहे व शिवसेना बाळासाहेबांना सुद्धा आता जबाब बोलू लागले असतील तर या सरकारला लखलाभ. निवडणूक हरलो तरी चालेल पण काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार नाही असंही देवेंद्र फडवणीस यांनी म्हटलं आहे.

विदर्भ- मराठवाड्याचा सरकारला तिटकारा -

बलात्काराचे प्रकार वाढले आहेत. शक्ती कायदा तयार होत आहे. फक्त शक्ती ऐवजी भक्ती यांची चालू आहे. भक्ती कायदा यांना आणायचा आहे. सर्वांना एकमेकाची भक्ती करायची आहे. आज राजरोसपणे गुन्हे घडत आहेत. सरकारमध्ये भ्रष्ट मंत्री असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते. या सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा तिटकारा आहे. मराठवाड्याच्या सर्व योजना यांनी बंद केल्या आहेत. वैधानिक विकास महामंडळमुळे विदर्भ मराठवाड्याला हक्काने न्याय भेटत होता. ते या सरकारने मारून टाकले. पण या सरकारमधील विदर्भ मराठवाड्यातील एकही आमदार बोलायला तयार नाही. असा आरोपही देवेंद्र फडणीस यांनी लगावला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांची प्रशंसा -

पाच वर्षांत ऊर्जा मंत्री म्हणून बावनकुळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्या दरम्यान कुणाचीही वीज कापली गेली नाही. गरज पडली तर सरकारमधून पैसे दिले गेले आहेत. आज लोकांच्या घरचे डीपी काढून नेण्यात येत आहेत. शाळेचे वीज कनेक्शन कापले जात आहे. पंकजा मुंडे मंत्री असताना कुपोषणाचा प्रश्‍न मार्गी लागला होता. आज देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कुपोषित बालके आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलवर पाच रुपये कमी केले त्यानंतर सुद्धा देशातील 25 राज्याने त्यांचे व्हॅट कमी केले. पण इथे व्हॅट कमी करणे सोडा केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या टॅक्सवर आपण टॅक्स लावतो तो सुद्धा कमी केलेला नाही. पाच रुपये कमी केल्यानंतर त्याची किंमत पावणे सात रुपये कमी व्हायला पाहिजे होती. ते सुद्धा या सरकारने केलेले नाहीत. हे सरकार फक्त जीएसटीचे उदाहरण देत आहे. पण त्यांचा मुख्य स्त्रोत हे दारूमध्ये आहे. दारूचा स्त्रोत हा यांचा मुख्य स्रोत आहे. याच्यामध्ये यांना हजारो कोटी रुपये भेटतात. जीएसटीच्या प्रश्नावर विनाकारण वाद निर्माण करून हे सरकार मोदी सरकारवर आगपाखड करत आहे.

सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात -

देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झालं त्याला मोदी सरकारचे सहकार्य लाभल म्हणून शक्य झालं. तरीसुद्धा इथलं सरकार मोदी सरकारला दोष देत आहे. परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. काँग्रेस नेते राहुल गांधी विदेशी लसीला परवानगी द्या असं सांगत होते. पण मोदींनी भारतीय बनावटीच्या स्वदेशी लशी तयार केल्या २८० दिवसात १०० कोटी लोकांच लसीकरण केलं. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत 21 बैठका घेतल्या आहेत. एक लाख कोल्ड स्टोरेजची चैन त्यांनी तयार केली. डिजिटल सर्टिफिकेट देणारा भारत पहिला देश होता. या सर्वांबाबत मोदींनी दृढता दाखवली. भारताला सन्मानाने इतर देशांसमोर उभे केलं. परंतु हे सरकार फक्त मोदींवर टीका करण्यासाठी निर्माण झाल आहे, असं देवेंद्र फडणीस यांनी सांगत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.