मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतल्याने (Murji Patel withdrew application) चर्चांना उधाण आले. आता हा अर्ज मागे घेण्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडलं जात आहे. विरोधकांनी भाजपला टीकेचे लक्ष केले असून याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सडकून उत्तर दिले (Devendra Fadnavis criticizes opposition) आहे.
मागच्या दाराने मागणी : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भामध्ये बराच विचार करण्यात आला होता. कार्यकर्त्यांची ही तशी इच्छा होती. तसेच मुंबई भाजपचीही तीच इच्छा होती, म्हणून आम्ही निवडणूक लढवली पाहिजे, असे ठरवण्यात आले. मागच्या निवडणुकीत मुरजी पटेल हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहून सुद्धा त्यांना 45000 मते भेटली होती. परंतु यंदा काही लोकांनी ही निवडणूक लढवू नये, असे (Fadnavis over Andheri East Assembly by election) सांगितले.
विरोधकांना चिमटा : त्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे त्याचबरोबर शरद पवार, अशा नेत्यांनीही समोरून ही निवडणूक लढू नये, असे सांगितलं. तर काहीजणांनी ही निवडणूक लढू नये, असेही मागून सांगितलं. परंतु राजकारणात सर्व गोष्टी सांगायच्या नसतात, असं सांगत देवेंद्र फडवणीस यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना चिमटा लगावला आहे. त्याचबरोबर दिवंगत आर आर पाटील असतील पतंगराव कदम असतील यांच्या दरम्यानसुद्धा आम्ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची आठवण त्यांनी याप्रसंगी करून दिली. भाजप ही निवडणूक लढवत नसली, तरी सुद्धा महाराष्ट्र कोणाबरोबर आहे ? हे आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालाने दाखवून दिले आहे, असेही ते (Andheri East Assembly by election) म्हणाले.
प्रकल्पांना गती देणार : सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोड सेफ्टी संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. रोड सेफ्टी संदर्भामध्ये ब्लॅकस्पॉट कालबाह्य पद्धतीने दूर करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर अपघात कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याची चर्चाही या बैठकीत झाली.
रोड सेफ्टी ॲक्शन प्लॅन : मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर वाहनं लेन सोडून चालतात, त्याबाबतही योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच राज्यातल्या सर्व महामार्गावर होणाऱ्या अपघात जागा, यावर ॲक्शन प्लॅन करण्याचीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितलं. मेट्रो कार्ड संदर्भात चर्चा करताना या संदर्भात निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचेही ते म्हणाले. केंद्र सरकारने प्रकल्प दिले हे योग्य आहेत, आता हे टीका करणाऱ्यांना समजलं आहे ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर केंद्राच्या योजनांना गती देण्याचं कामही लवकर केलं जाणार, असल्याचेही ते म्हणाले.