ETV Bharat / city

देवेंद्रजी स्वप्न बघायचं बंद करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, तुम्ही नाही.. मलिकांचा फडणवीसांवर घणाघात

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत जोरदार घणाघात केला आहे. अद्यापही आपणच मुख्यमंत्री असल्याचा भास त्यांना होतोय. आताही उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत, कारण अजूनही ते स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. देवेंद्रजी स्वप्नातून बाहेर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, तुम्ही नाही, असं खरमरीत ट्विट मलिक यांनी केलं आहे.

nawab malik
nawab malik
author img

By

Published : Nov 16, 2021, 7:43 PM IST

मुंबई - राज्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला कोणी तयार नाही" असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीतील भाषणादरम्यान केलं. त्यांच्या या वक्तव्याचा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समाचार घेत देवेंद्र फडणवीस यांना अद्यापही आपणच मुख्यमंत्री असल्याचा भास होतोय. आताही उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत, असं खरमरीत ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

nawab malik
नवाब मलिकांनी केलेले ट्विट
देवेंद्र फडणवीस यांचा आघाडी सरकारवर हल्ला -
भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या आज कार्यकारणी बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. राज्य सरकार प्रत्येक मोर्चावर अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी समाजाचे प्रश्न, इंधन दरवाढ याबाबत आघाडी सरकारला कोणतेही घेणे-देणे नाही. केवळ भ्रष्टाचार करण्याचे एकच लक्ष महाविकास आघाडी सरकारचे आहे. राज्यात मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अंतिम लढाई लढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केलं आहे.

राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालं आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध ठेवले जात आहे. आज जिल्ह्या-जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचे अवैध रेती, अवैध दारूचे नेक्सस सुरु आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशी अवस्था कधीही पाहिली नव्हती. या सरकारमध्ये कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे’चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणीही पाहायला तयार नाही. एका मुलीवर 400 लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करु. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.