ETV Bharat / city

Maharashtra Assembly Session शिवसेनेला रोखण्यासाठी शिंदे गटाची नवी खेळी, फडणवीसांची सभागृह नेतेपदी नियुक्ती - शिवसेनेला रोखण्यासाठी शिंदे गटाची नवी खेळी

शिवसेनेला कंट्रोल करण्यासाठी शिंदे सरकारने विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांची सभागृह नेता पदी नियुक्ती केली आहे. भाजपाची ही खेळी असली तरी अंबादास दानवे Ambadas Danave यांना कशाप्रकारे ती कशी मोडून काढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly Session
author img

By

Published : Aug 17, 2022, 4:46 PM IST

मुंबई राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे आक्रमक नेते अंबादास दानवे हे विरोधीपक्ष नेते आहेत. शिवसेनेला कंट्रोल करण्यासाठी शिंदे सरकारने विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांची सभागृह नेता पदी नियुक्ती केली आहे. भाजपाची ही खेळी असली तरी अंबादास दानवे Ambadas Danave यांना कशाप्रकारे ती कशी मोडून काढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल महिनाभर राज्य सरकारचा कारभार सांभाळला. विरोधकांनी यावरून शिंदे सरकारला धारेवर झाले होते. महिनाभरानंतर शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. खातेवाटप ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला केले. विरोधकांनी यावरून शिंदे सरकार व टीकेची झोड उडवली असताना, आता पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.

अंबादास दानवेना रोखण्यासाठी नवी रणनीती : राज्यात शिवसेनेत बंडखोरी केलेल्या शिंदे गटावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. अशातच शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेल्या अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दानवे शिंदे गटाला नियमित आव्हान देत असतात. आता सभागृहात शिंदे गट विरोधात अंबादास दानवे असा सामना रंगणार आहे. सरकारमधील मंत्र्यांना उशिराने खाते वाटप दिले आहे. विरोधीपक्ष नेते दानवे नवनिर्वाचित मंत्र्यांना यावरून विधान परिषदेत कोंडीत पकडतील. संबंधित मंत्री यावेळी अडचणीत येऊन सरकारची गोची होऊ नये, यासाठी अंबादास दानवे यांना रोखण्यासाठी नवी रणनीती आखली असून विधान परिषदेच्या सभागृह येथे पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याचे बोलले जाते.

उपसभापतींनी केली घोषणा : विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस यांची सभागृह नेतेपदी तर तालिका अध्यक्षपदी प्रसाद लाड, नरेंद्र दराडे, सुधीर तांबे आणि अब्दुल दुराणी यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली.

सभागृह आणि परिषदेत फडणवीसांची कसरत : राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून देवेंद्र फडणवीस यांची धावपळ उडाली आहे. मंत्रिमंडळ नेमण्यापासून खाते वाटपापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वरदहस्त कायम राखला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभागृहात विरोधकांना सामोरे जाण्याचे आणि स्वतःचा गट सांभाळण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे सगळी सूत्रे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हातात ठेवले आहे. आताही विधानसभा आणि विधान परिषदेत देखील देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा - Monsoon Session 22 आदित्य ठाकरे भाजपच्या मतावर निवडून आले –आशिष शेलार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.