ETV Bharat / city

'महाराष्ट्राच्या इतिहासात असे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत'

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्र्यांवर त्यांनी सडकून टीका केली.

Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 28, 2020, 11:42 AM IST

Updated : Nov 28, 2020, 12:26 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. गेल्या एका वर्षात या सरकारची काहीच उपलब्धी नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली, त्या मुलाखतीत त्यांनी एका वर्षात काय केले, काय अडचणी आल्या. सरकारची पुढची दिशा काय, विकासाचे धोरण काय याबाबत बोलायला पाहिजे होते. मात्र, मुलाखत फक्त टीका टिप्पणी करण्यात गेली, अशी टीका फडणवीस यांनी केली. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांच्याइतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद..

चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री फार काळ टिकले नाहीत -

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेल्या वक्तीला न शोभणारे वक्तव्य त्यांनी केले. राग किंवा आणि द्वेषाशिवाय काम करण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्री त्याचे पालन करत नाहीत, अशी सणसणीत टीका फडणवीस यांनी केली आहे. मुलाखतीत विकासावर चर्चा करण्याऐवजी खिचडी नाही, हातधुवून मागे लागू, असे वक्तव्य केले. हे शब्द कोणते असा सवाल फडणवीस यांनी केला. ते मुलाखतीत बोलले तशी भांडणं नाक्यावर होतात, वर्षपुर्तीला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच चिरडण्याची भाषा करणारे फार काळ टिकले नाहीत, असेही सुनावले.

मुख्यमंत्र्यांची मुलाखत टिप्पणी करण्याच्या लायकीची नाही -

मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत मी मानत नसून ती टिप्पणी करण्याच्या लायकीची नाही. पाच वर्ष करा राज्य करा, पण धमक्या देण्याचे काम करू नका, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखे वागावे, असेही फडणवीस म्हणाले.

फक्त निर्णयांना स्थगिती देण्याचे काम -

सरकार विश्वास घातातले सरकार आहे. या सरकारने आम्ही घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचे काम केले आहे. मग ते जलयुक्त शिवार, बाजार समिती मतदान,सार्थ, आरे कारशेड असो. आरे कारशेडमधील जागा योग्य होती, त्यामुळे कोणतेही नुकसान होत नव्हते. हे सत्य आम्ही मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवणार, असेही फडणवीस म्हणाले. काही अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत.

सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी -

कोरोना हाताळण्यात हे सरकार सपशेल अपयशी झाले आहे, त्यामुळे दुसरी लाट येवू नये, ही इच्छा आहे. देशात आतापर्यंत १ लाख ३४ हजार मृत्यू झाले. त्यातले ४६ हजार मृत्यू महाराष्ट्रात झाले, तरीही कोरोना थोपवल्याचा दावा हे सरकार करत आहे, अशी टीका फडणवीसांनी केली. सरकारचे कोरोनावर नियंत्रण नव्हते, तसेच कोरोनाकाळात राज्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असून तो आम्ही राज्यातील जनतेसमोर आणणार असेही फडणवीस या पत्रकार परिषदेत म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलेल्या वचनांचे पालन नाही -

मुख्यमंत्री पदाचे न दिलेले वचन त्यांना माहित आहे, पण शेतकऱ्यांना दिलेले वचन त्यांना आठवत नाही, असा सणसणीत टोला फडणवीसांनी लगावला. जे पिकेल ते विकेल असे म्हणता, मात्र, जे पिकलंय त्यांच्या खरेदीची व्यवस्था नाही, कोरोनाकाळात कोणालाही मदत मिळाली नाही. मात्र, तरीही हे सरकार खूप काम केल्याचे सांगत आहे, असे ते म्हणाले.

विज बील प्रकरणी सरकारमध्ये समन्वय नाही -

या तीन पक्षांच्या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे, विज बील प्रकरणी दिसून आले आहे. तसेच सध्या मंत्रालयात फक्त बदल्यांचे दलाल फिरत आहे. काँग्रेसच्या १५ वर्षाच्या कार्यकाळातही एवढी वाईट अवस्था पाहिलेली नाही. आम्ही सक्षम विरोधीपक्ष आहोत, आम्ही जनतेला न्याय मिळवून देऊ, असे फडणवीसांनी सांगितले.

माझ्या पत्नीवर शिवसेना नेते टीका करतात -

ईडीकडे पुरावे आहेत, त्यानुसार कारवाई केली जाते. मात्र, आम्ही शिवसेना नेत्यांसारखे कोणाच्या घरच्यांवर बोलत नाही. शिवसेना नेते माझ्या पत्नीवर वाट्टेल ते टीका करतात, आम्ही त्या पातळीची टीका करत नसून कोणालाच वैयक्तिक बोलत नाही, असे फडणीस म्हणाले. या अनैसर्गिक युतीमुळे सर्वात जास्त नुकसान हे महाराष्ट्राचे आणि जनतेचे झाले आहे, असेही ते म्हणाले.

कंगना-अर्णब यांच्या मताशी सहमत नाही -

आम्ही कंगना राणौत आणि अर्नब गोस्वामी यांच्या मताशी सहमत नाही. तसेच चिरडून टाकण्याची ही जी सरकारी वृत्ती आहे, त्याच्याशीदेखील आम्ही अजिबात सहमत नाही, असे फडणवीस म्हणाले. व्यक्तीस्वातंत्र्य ही मौल्यवान बाब आहे. गोस्वामी यांनी टीव्हीवर व्यक्त केलेली मते सरकारसाठी अडचणीची होती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली, असा आरोप फडणवीसांनी केला. कायदा हा कोणालाही लक्ष्य करण्यासाठी नसतो, हे शुक्रवारी उच्च न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईप्रकरणी दिलेल्या निकालातून स्पष्ट होतो, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा -'ये पब्लिक सब जानती है'; पाहा राज्यसरकारवर केंद्राच्या दबावाबाबत काय म्हणाले संजय राऊत..

हेही वाचा -महाविकास आघाडी सरकार वर्षपूर्ती: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची 'विशेष मुलाखत'

Last Updated : Nov 28, 2020, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.