नवी मुंबई - दिल्लीत लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. काँग्रेसने याघटनेच्या विरोधात दिल्लीत जोरदार आंदोलन केलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देखील त्या आंदोलनात उपस्थित होते. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून, दिल्लीत डोकं वर काढून आंदोलन करायचं मात्र महाराष्ट्रात तोंड लपवत फिरायचं, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
नवी मुंबईत गणेश नाईक फाउंडेशनच्या वतीने व नवी मुंबई महानगरपालिकेला 9 रुग्णवाहिका, ग्रंथालयास एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके तसेच जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात करमणुकीचे साहित्य पूरविणे या कामांचा लोकार्पण सोहळा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना अधिक -
दिल्लीत नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर जो अत्याचार झाला ही घटना अंत्यत दुःखद असून,त्याचा आम्हीही निषेधचं करतो मात्र, दिल्लीत काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली या घटनेच्या विरोधात जे धरणे आंदोलन करण्यात आले आहे हे निव्वळ ढोंग आहे. कारण आजच्या घडीला अशा घटना महाराष्ट्रात अधिक होत आहेत. मात्र महाराष्ट्रात अशा घटना घडलेल्या घटनास्थळी डॉ नितीन राऊत कधीही गेले नाहीत, किंवा महाराष्ट्रातील अशा घटनेतील पीडित परिवाराला भेटले देखील नाहीत ना अशा परिवारावर झालेल्या अन्यायाविरुद्ध ना आवाज उठविला ना स्वतःच्या सरकारला अशा घटनांचा जाब विचारला. मात्र तुम्ही उत्तर प्रदेश व दिल्लीला जाता, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्य सरकारवर टीका करताना महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात होत असलेल्या महिला अत्याचाराचा पाढाच वाचला. यावेळी दिल्लीत डोकं वर काढून आंदोलन करायचं मात्र महाराष्ट्रात तोंड लपवत फिरायचं अशी जोरदार टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.