मुंबई - काँग्रेसची सत्ता असलेल्या परभणी महापालिकेला मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र, आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अंतर्गत सुसंवादामुळे विकासकामांकडे व जनतेकडे दुर्लक्ष होत आहे.
भाजपला रोखण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत आलो - अशोक चव्हाण
सरकारमधील काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी परभणीत एका कार्यक्रमात सरकारमध्ये सुसंवाद नसल्याचे एक वक्तव्य केले होते. तसेच महाविकास आघाडीत आपण का सत्तेत आलो याबद्दल देखील वक्तव्य केले. चव्हाण म्हटले की, विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण, राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकास आघाडी प्रत्यक्षात आली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला.
दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या अंतर्गत सुसंवादामुळे विकासकामांकडे दुर्लक्ष - प्रवीण दरेकर
पुढे चव्हाण म्हटले की, परभणी काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र, आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, परभणी काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र, आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला. यामुळे महाविकास आघाडीतला विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बदल्या आणि विकास कामातील निधी वाटपावरूनच मंत्र्यांमध्ये वाद आहेत. यामुळे जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. सामान्य लोकं भरडले जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.