मुंबई - - राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करताना, मत पत्रिका खराब होऊ नये. त्यावर कोणताही डाग असून नये, मतदान पत्रिकेवर टीक कशी करायची, याबाबत सूचना केल्या आहेत. अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले आहेत. महाविकास आघाडीच्या एकत्र पहिल्यांदा मतदानाला प्रक्रियेला जाताना प्रक्रिया माहिती असावी असायला हवी, नेते म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण केले. भाजपकडून घोडेबाजाराचा आरोप सुरु आहे. त्यांचे ते स्वतंत्र्य आहे. मात्र आघाडीच्या आमदारांनी एकत्र येणे म्हणजे घोडेबाजार नाही, असा टोला उपाध्यक्ष झिरवाळ यांनी भाजपला लगावला. तसेच संख्याबळ मोठे असल्याने निश्चित निवडून येऊ, असेही उपाध्यक्ष झिरवाळ म्हणाले.महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
90 टक्के आमदार हे मतदान प्रकियेबाबत अनभिज्ञ - राज्यसभेच्या निवडणुकीत मताधिक्य राखण्यासाठी रस्सीखेच सुरु असतानाच सुमारे ९० टक्के आमदार मतदान प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांना निवडणूक प्रक्रिया समजावून सांगितल्याची माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली.
घोडेबाजार रोखण्यासाठी आमदार एकत्र - राज्यसभेची येत्या १० जूनला निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने चार तर भाजपने तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरसीची निवडणूक होणार आहे. अपक्ष आमदारांची भूमिका यावेळी महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे छोटे व अपक्ष आमदारांसह महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांची हॉटेल ट्रायडेंट येथे मंगळवारी बैठक पार पडली. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खर्गे, एच. के. पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घोडेबाजार रोखण्यासाठी आमदारांना सुरक्षित ठेवल्याची चर्चा रंगली. मात्र, या चर्चेला उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी छेद दिला आहे.
खबरदारी घ्या - महाविकास आघाडीकडे चार जागा निवडून येतील, एवढे संख्याबळ आहे. घोडेबाजार करण्याचा काहीही संबंध नाही. उलट २४ वर्षांनी राज्यसभेची निवडणूक होत आहे. सुमारे ९० ते ९५ टक्के आमदार पहिल्यांना मतदान करणार आहेत. अनेकांना ९० टक्के आमदारांना निवडणूक प्रक्रिया माहित नाही. ही प्रक्रिया समजून सांगण्यासाठी बैठक घेतली. तसेच निवडणुकीला सामोरे जाताना मत बाद होऊ नये, यासाठी खबरदारी घेतल्याचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी सांगितले.
काळजी घ्या, घाबरू नका - राज्यात कोविड रुग्ण संख्या वाढत असली तरी घाबरायचे कारण नाही. अत्यावश्यक सोयी सुविधा आणि यंत्रणा आहेत. त्यांचा फायदा कसा घ्यायचा याबाबत सूचना करण्यात आल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.
हेही वाचा - MLC Election Candidate : सर्व पक्षांकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोण कोण लढणार