ETV Bharat / city

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत - अजित पवार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या आहेत.

Deputy Chief Minister Ajit Pawar
शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत - अजित पवार
author img

By

Published : Sep 2, 2021, 10:30 PM IST

मुंबई - राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार म्हणाले.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या राज्याला विशेष सूचना -

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र, केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत चर्चा करून त्यानंतर निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय दोन दिवसांत होईल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.