मुंबई - जिल्हा नगरपरिषद आणि आमदारांच्या निधी संदर्भात सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याने त्यासाठी अकरा आमदारांसह उपोषणाचा इशारा देणारे जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंगळवारी समजूत काढली. यामुळे त्यांनी आपण उपोषण करणार नसून ते मागे घेत असल्याची माहिती दिली.
जिल्ह्यात आमदार आणि नगरपरिषदेच्या निधी वाटपाच्या संदर्भात सावत्रपणाची वागणूक दिली जाते. आमदारांनाही योग्य पद्धतीचा निधी दिला जात नाही, असा दावा करत आमदार गोरंट्याल यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन या विषयीची नाराजी व्यक्त केली होती. मध्येच त्यांनी नगरपरिषदेला देण्यात येणाऱ्या निधी वाटपात योग्य न्याय मिळाला नाही, तर याविषयी अकरा आमदारांसह उपोषण करू, असा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर काल मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरंट्याल यांना बोलावून त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. या संदर्भात गोरंट्याल यांची असलेली नाराजी पवार यांनी दूर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही फोनवरून यासाठी निधीत वाटा देण्यासंदर्भात आश्वासन दिले असल्याची माहिती गोरंट्याल यांनी दिली.
नगरपरिषदेच्या निधी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेस आमदारांना देण्यात येणारा निधी संदर्भात आपण नाराज होतोच. मात्र, आता मार्ग निघाला असल्याने त्याविषयीची नाराजी दूर झाली आहे, असे त्यांनी सांगितले. नगरपालिकांच्या विकासकामांचा निधी पीडब्ल्यूडीला देण्यात आला होता. त्या संदर्भात ही त्यांनी अजित पवार यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची अजित पवारांनी काढली समजूत - congress mla kailas gorantyal
जिल्ह्यात आमदार आणि नगरपरिषदेच्या निधी वाटपाच्या संदर्भात सावत्रपणाची वागणूक दिली जाते. आमदारांनाही योग्य पद्धतीचा निधी दिला जात नाही, असा दावा करत आमदार गोरंट्याल यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन या विषयीची नाराजी व्यक्त केली होती. तर मध्येच त्यांनी नगरपरिषदेला देण्यात येणाऱ्या निधी वाटपात योग्य न्याय मिळाला नाही तर याविषयी अकरा आमदारांसह उपोषण करू, असा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर काल मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरंट्याल यांना बोलावून त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.