ETV Bharat / city

Power Shortage In Maharashtra : महाराष्ट्र होणार घामाघूम.. ऐन उन्हाळ्यात कोळशाची टंचाई.. वीज निर्मिती ठप्प.. - Power Cut Off Maharashtra

राज्यातील विजेची मागणी उष्णतेच्या लाटेमुळे वाढल्याने ( Demand for electricity increased in Maharashtra ) आता वीज टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली ( Power Shortage In Maharashtra ) आहे. त्यातच कोळश्याअभावी काही वीज निर्मिती केंद्रांवरील वीज निर्मिती ठप्प झाल्याने प्रश्न अधिक गंभीर झाला ( Lack of coal power generation ) आहे. यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत असून, सेंट्रल सेक्टर आणि गुजरातमधून वीज खरेदी केली जात ( Purchase electricity from Gujarat ) आहे.

महाराष्ट्र होणार घामाघूम.. ऐन उन्हाळ्यात कोळशाची टंचाई.. वीज निर्मिती ठप्प..

author img

By

Published : Apr 13, 2022, 3:15 PM IST

मुंबई : राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाल्याने विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली ( Demand for electricity increased in Maharashtra ) आहे. त्यामुळे राज्य सरकारला वीज पुरवठा करताना दमछाक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक विजेची मागणी झाल्याने राज्य सरकारला सुमारे अकराशे मेगावॅट विजेचा तुटवडा दररोज भासतो ( Power Shortage In Maharashtra ) आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी काही फिडरवर चक्राकार पद्धतीने भारनियमन, काही वेळासाठी करण्यात येत असल्याची माहिती ऊर्जा विभागाने दिली आहे.

कोळश्याअभावी वीजनिर्मितीचा प्रश्न गंभीर : सध्या राज्यात पंचवीस हजार मेगावॅटचा आसपास विजेची मागणी आहे. सकाळच्या वेळेस विजेची मागणी सरासरी २४ हजार १०० मेगावॅट इतकी असते. दुपारी ही मागणी २४६०० मेगावॅट पर्यंत पोहोचते. रात्री २२ हजार मेगावॅट पर्यंत मागणी नोंदवली जात आहे. दररोज अकराशे मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवत ( Lack of coal power generation ) आहे.

किती झाली वीज निर्मिती? : राज्यातील ७ वीजनिर्मिती केंद्रांमधून ९ हजार ३३० मेगावॅटची क्षमता असताना केवळ ५ हजार ९०० मेगावॅट इतकी वीज निर्मिती झाली. राज्यात महानिर्मिती आणि खाजगी वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्या तसेच जलविद्युत आणि सौर ऊर्जा यांच्या माध्यमातून राज्याला केवळ १८ हजार ५०० मेगावॅट इतकीच वीज उपलब्ध होत आहे. उरलेल्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याने सेंट्रल सेक्टरमधून सुमारे ८ हजार ३०० मेगावॅट वीज खरेदी केली. तर विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी गुजरातच्या टाटा सीजीपीएलकडून ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्यात येणार ( Purchase of electricity from Gujarat ) आहे. यामुळे राज्यातील विजेची मागणी आपण पूर्ण करू शकतो, असा दावा महावितरणने केला आहे.

राज्यातील कोळशाची उपलब्धता : राज्यातील वीज निर्मितीच्या महत्त्वाच्या केंद्रांवर वीजनिर्मितीसाठी कोळसा मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. राज्यातील सात महत्त्वाच्या वीज निर्मिती केंद्रांवर सुमारे १५ लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, त्यापैकी आतापर्यंत केवळ ६ लाख २० हजार मेट्रिक टन इतकाच कोळसा उपलब्ध आहे. भुसावळ, चंद्रपूर, नाशिक, खापरखेडा, कोराडी, परळी आणि पारस या केंद्रांवर वीजनिर्मितीसाठी दररोज सुमारे एक लाख मेट्रिक टन कोळशाची आवश्यकता असते. मात्र, काही केंद्रांवर केवळ दीड ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे.

भारनियमन अनिवार्य : भुसावळ येथे दीड दिवस, नाशिक येथे अडीच दिवस, खापरखेडा येथे सात दिवस, कोराडी येथे दोन दिवस, परळी येथे एक दिवस, पारस येथे पाच दिवस, चंद्रपूर येथे सात दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे जसा जसा कोळसा उपलब्ध होईल तशी विज निर्मिती होईल, असे सांगतानाच गुजरात आणि सेंट्रल सेंटर सेक्टर मधून मिळणाऱ्या विजेमुळे सध्या तरी फार भारनियमन करावे लागणार नाही मात्र चक्राकार पद्धतीने काही फिडरवर भार नियमन करणे अनिवार्य असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.