ETV Bharat / city

Delta Plus Variant : राज्यात 27 नवे रुग्ण, रुग्णांची संख्या 103 वर - राज्यातील डेल्टा प्लस रुग्ण

राज्यात काल (सोमवारी) 27 नवे रुग्ण आढळून आल्याने डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 103 इतकी झाली आहे.

डेल्टा प्लस
डेल्टा प्लस
author img

By

Published : Aug 24, 2021, 2:17 AM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आटोक्यात येत असताना डेल्टा प्लसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात काल (सोमवारी) 27 नवे रुग्ण आढळून आल्याने डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 103 इतकी झाली आहे. डेल्टा प्लसला रोखण्यासाठी राज्यात विभागीय पातळीवर रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

27 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंटचे 76 रुग्ण होते. त्यात 27 नव्या रुग्णांची भर झाली आहे. अहमदनगर येथे 4, नागपूर येथे 5, अमरावती येथे 6, नाशिक येथे 2, गडचिरोली येथे 6, यवतमाळ येथे 3, भंडारा येथे 1 नवा रुग्ण आढळून आला आहे. यामुळे राज्यातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 103 झाली आहे. आतापर्यंत डेल्टा प्लसमुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 76 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 22 जणांना लसीचे डोस घेतल्यानंतरही डेल्टा प्लसची लागण झाली आहे.

लस घेतलेल्या 22 जणांना डेल्टा लागण

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या 22 जणांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. 22 पैकी 10 जणांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. तर, 12 जणांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी 2 व्यक्तींनी कोव्हॅक्सिन तर इतर 20 जणांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले होते.

5 रुग्णांचा मृत्यू

डेल्टा प्लसच्या 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात 3 पुरुष 2 स्त्रिया आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 2, बीड, मुंबई, रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले पाचही रुग्ण 65 वर्षांवरील असून त्यांना अति जोखमीचे आजार होते. मृत्यू झालेल्या 2 जणांनी कोव्हिशिल्डचे डोस घेतले होते. 2 जणांनी कोणतीही लस घेतली नव्हती. तर एकाच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सेंटीनल सर्वेक्षण, जिनोमिक सिक्वेन्सिंग

राज्यातील 5 प्रयोगशाळा आणि 5 रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवड्याला 15 प्रयोगशालेय नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या पुणे स्थित संस्थांना पाठवते. जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजेच, जिनोमिक सिक्वेन्सिंगला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून, या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून 100 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

रत्नागिरी १५
जळगाव १३
मुंबई ११
कोल्हापूर ७
गडचिरोली ६
अमरावती ६
ठाणे ६
पुणे ६
नागपूर ५
अहमदनगर ४
रायगड ३
पालघर ३
यवतमाळ ३
नांदेड २
गोंदिया २
सिंधुदुर्ग २
चंद्रपूर १
अकोला १
सांगली १
नंदुरबार १
औरंगाबाद १
बीड १
भंडारा १

एकूण रुग्ण - १०३

हेही वाचा - Genome Sequencing Result : मुंबईत १८८ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ चे १२८, अल्फाचे २, केपाचे २४ रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.