नवी दिल्ली - शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधातील एफआयआर रद्द ( Sanjay Raut seeking quashing of FIR against him ) करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी ९ डिसेंबरला संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल ( Shivsena MP Sanjay Raut booked in New Delhi ) केली होती. यावरून राऊत यांच्यावर 12 डिसेंबरला एफआयआर नोंदवण्यात आला होता. संजय राऊत यांची एक मुलाखत ९ डिसेंबरला प्रसारित झाली होती. या मुलाखतीत राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी अपशब्द वापरले होते.
दीप्ती रावत भारद्वाज यांनी मंडावली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांच्या माफी मागून आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी दीप्ती रावत भारद्वाज यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून केली होती. हे प्रकरण 15 फेब्रुवारी 2022 रोजी न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाने संबंधितांना नोटीस जारी केली असून सुनावणीसाठी 6 एप्रिल 2022 रोजी हे प्रकरण सूचीबद्ध केले. याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व श्रेयश यू. ललित यांनी केले तर राज्याचे प्रतिनिधित्व नंदिता राव यांनी केले.
काय म्हणाले होते राऊत?
शरद पवार (Sharad Pawar) यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.
हेही वाचा - Big Incident in UP : यूपीत मोठी दुर्घटना; हळदीच्या कार्यक्रमात विहिरीत पडून 11 महिलांचा मृत्यू, अनेक गंभीर