मुंबई 31 डिसेंबर 2016 रोजी बंगळुरूमध्ये अनेक महिलांचा विनयभंग Bangalore women molestation case करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणावरुन अबू आझमी यांनी 3 दिवस महिलांवर अनेक आक्षेपार्ह टिका केल्या होत्या. महिला केवळ साडी आणि बुरख्यातच चांगल्या व सुरक्षित असतात,असे वक्तव्य अबु आझमी यांनी त्यावेळी केले होते. तसेच आझमी यांनी पेट्रोल असेल तर आग लागेल, गूळ असेल तर मुंगी येईल, असेही वादग्रस्त वक्तव्य त्यावेळी केले होते. Petition against Abu Azmi
त्यामुळे अबू आझमी यांचे असे विधान बलात्काऱ्याला प्रोत्साहन देणारे होते. त्यासाठी दिल्ली येथील महीला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती महिवाल यांनी बोरिवली कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाची आज बोरिवली कोर्टात सुनावणी होती. जिथे न्यायाधीशांसमोर त्यांचे जवाब नोंदवण्यात आले. स्त्रियांबाबत अश्या प्रकारची मानसिकता ठेवणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्वाती महिवाल यांनी न्यायालयाकडे केली आहे. आपला न्यायालयावर विश्वास असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.
हेही वाचा Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस म्हणतात मी अमिताभ नाही तर अमजद खान, वाचा सविस्तर