मुंबई - मेट्रो कार शेड प्रकल्प ( Metro Car Shed Project ) आरे येथेच राबवण्याचा निर्णय एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) सरकारने घेतला आहे. आरेमध्ये कारशेड ( Carshed in Aarey ) झाल्यास मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल म्हणून कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात असलेल्या तात्कालीन उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) सरकार यांनी कार शेड प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यामुळे मेट्रो प्रकल्पांना जवळपास चार वर्षे विलंब होणार होता. तसेच 20 हजार कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाला कारशेड कांजूरमार्ग येथे नेल्यामुळे अतिरिक्त 22 हजार कोटींचा खर्च वाढणार होता. मात्र उद्धव ठाकरे सरकारने केवळ "इगो" मुळे आरे मधून कार शेड हलवण्याचा निर्णय घेतला होता असा थेट आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
मुंबईकरांच्या जीवाशी खेळ - आरेमध्ये कार शेड चे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नाही लवकर पूर्ण होऊ शकते. तसेच उद्धव ठाकरे सरकारने नेमलेल्या सोनिक कमिटीने देखील कार शेड आरेमध्येच करणं योग्य असेल. कांजूरमार्ग येथे कारशेड हरवल्यास अधिक वेळ, अधिक पैसा लागेल असा निर्णय दिला होता. याची आठवण देवेंद्र फडणीस यांनी यावेळी करुन दिली. आरे मधील मेट्रो कार शेडला उशीर म्हणजे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मेट्रो प्रकल्पामुळे सतरा लाख मुंबईकरांचा प्रवास सुखर होईल. तसे प्रकल्पाला विलंब होत गेल्यास त्याचा खर्च वाढत जाणार आहे. त्यामुळे सर्व गोष्टी लक्षात घेऊन पर्यावरणवाद्यांनी देखील या प्रकल्पाला विरोध करू नये असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल आहे. सह्याद्री अतिथीगृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रो कार शेड संदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - Draupadi Murmu : नगरसेविका ते देशाच्या प्रथम नागरिक; वाचा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा राजकीय प्रवास
पर्यावरण वाद्याची चर्चा करू - आरे मध्ये होणाऱ्या मेट्रो कार शेडला काही पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. मात्र त्या पर्यावरणवादी नागरिकांबरोबर देखील चर्चा केली जाऊ शकते. तसेच राज्यात देवेंद्र फडणीस सरकार असताना पर्यावरण वादी या प्रकल्पाच्या विरोधात न्यायालयात गेले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील पर्यावरणवाद्यांच्या विरोधाचे निकाल दिला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करून प्रकल्पाला विरोध करू नये. मात्र तरीही प्रकल्पाला कोणी विरोध करत असेल तर यामागे काही हेतू आहे का? हे तपासले पाहिजे असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच या प्रकल्पामुळे 20 लाख टन मेट्रिक टन कार्बन डाय-ऑक्साइड कमी होणार असल्याचे आठवणही देवेंद्र फडणीस यांनी करून दिली आहे.
अवैध बांधकामांमुळे मिठी नदीला पूर - मेट्रोचे कारशेड आरे येथे झाल्या मिठी नदीला पूर येण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांचा त्रास वाढेल अशी शक्यता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वर्तवली. मात्र त्यांच्या वक्तव्याचा उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणीस यांनी खंडन करत मिरची नदीवर येणारे पूर हे नदी नदीच्या परिसरात होणाऱ्या अवैध बांधकामामुळे येत आहे. महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असूनही या अवैध बांधकामांना शिवसेनेला रोखता आले नाही. तो रोखले असता तर, मिठी नदीला पूर आला नसता असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
हेही वाचा - Praful Patel : प्रफुल्ल पटेलांना मोठा धक्का; ईडीने मुंबईतील घर केलं जप्त