ETV Bharat / city

Deepak Kesarkar : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असा फॉर्म्युला का नाही-दीपक केसरकर

Deepak Kesarkar : मुंबई महापालिकेत थेट शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असा युतीचा फॉर्मुला का राखला नाही, असा सवाल उपस्थित करत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राणे आदरणीय नेते आहेत, असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले आहेत.

दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
author img

By

Published : Aug 7, 2022, 7:06 AM IST

मुंबई - शिवसेनेत पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे गट टीकेचे लक्ष्य बनला आहे. त्यामुळे बचावासाठी सातत्याने उद्धव ठाकरेंकडून युतीच्या चर्चा झाल्याचा आरोप सुरू झाला आहे. आता मुंबई महापालिकेत थेट शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असा युतीचा फॉर्मुला का राखला नाही, असा सवाल उपस्थित करत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राणे आदरणीय नेते आहेत, अशी सारवासारव केली. मुंबई महापालिकेवर शिवसेनेने आपले पाय घट्ट रोवले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा या महापालिकेवर डोळा आहे.

मराठी माणूस मुंबई महापालिकेसाठी झगडतोय - आता शिंदे गटानेही मुंबई महापालिकेतील सेना- भाजप युतीवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मुंबई मनपामध्ये शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळामध्ये केवळ चार जागांचा फरक होता. भाजपने शिवसेनेला त्यावेळी बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला होता. तोच फॉर्मुला पुढे चालू राहू शकला असता किंवा शिवसेनेच्या महापौर आणि भाजपचा उपमहापौर असेही करता आला असता. तसं झाले असते, तर मराठी माणसाचा आणि मराठी माणूस ज्या मुंबई महापालिकेसाठी झगडतोय. त्याचा स्वाभिमान कायम राखता आला असता, असे सांगत केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेल्या शिवसेनेच्या कामगार संघटनांवर भाजपसोबत वाटाघाटी करायला हव्या होत्या, असे मत मांडले आहे. मोठया माणसाच्या चर्चेत या विषय यायला हवा, असेही ते म्हणाले.

जेवढा पुढाकार घ्यायचा होता, तेवढा घेतला - यामुळे केसरकर यांचा रोख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत युती करायची होती, तेव्हा आम्हाला विश्वासात घेतले नाही. आम्ही देखील भाजपवर सोबत गेल्यावरून विश्वासघातकी, गद्दार बोलू नये. आदित्य ठाकरेंकडून अशी विधाने सातत्याने होत आहेत. त्यांची ही विधाने पेपर नॅपकिन ज्या पद्धतीने वापरून फेकला जातो, अशा स्वरूपाचे आहे. त्यामुळे कार्यकर्ते राहतील की माहीत नाही. मात्र, आजही मला शिवसैनिकांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी फोन येत आहेत. मी प्रयत्न केले, जेवढा पुढाकार घ्यायचा होता, तेवढा घेतल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले आहे.

संवेदनशील मतदार संघ म्हणून ओळख - उद्धव ठाकरे भाजप सोबत युती करायची होती. याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोण खोटं बोलतयं हे समोर आले नाही. माझा आजही सवाल आहे, त्यांनी याबाबत भाष्य करावे. हे सगळं खोटे असेल तर मी पदाचा राजीनामा देईन, असे केसरकर यांनी सांगितले. नारायण राणे यांचा आणि माझा वाद संपला आहे. जेव्हा मी त्यांना भेटतो, तेव्हा आदरपूर्वक बोलतो. यापुढे नारायण राणे यांच्यावर भाष्य करणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच संवेदनशील मतदार संघ म्हणून ओळख होती. त्यामध्ये कार्यकर्त्यांचे अंतर्गत वाद कारणीभूत होते. राजकीय नेते कधी वाद करत नाहीत, असे ही केसरकर यांनी सांगितले. राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेपेक्षा शिंदे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. बाळासाहेबांचे विचार शिंदे पुढे घेऊन निघाले आहेत. लोकांनीही ते मान्य आहे. त्याचाच हा विजय आहे. ज्या भागात आदित्य ठाकरे यांनी दौरे केले तिकडे त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे बंडखोरी केलेले आमदार निवडून येणार नाहीत, हा त्यांचा भ्रम आहे. तो त्यांनी सोडून द्यावा, असा सल्ला केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

हेही वाचा - CWG 2022: विनेश फोगटने कुस्तीमध्ये जिंकले सुवर्णपदक..

हेही वाचा - Jagdeep Dhankhar Wins : जगदीप धनखड़ भारताचे नवे उपराष्ट्रपती.. मार्गारेट अल्वा यांचा पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.