ETV Bharat / city

Kesarkar on Prabhu : केसरकरांनी फटकारले, अभिनंदनच्या प्रस्तावावेळी राजकीय फड नको

author img

By

Published : Jul 3, 2022, 8:33 PM IST

राज्य विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Assembly Speaker Rahul Narvekar ) यांच्या अभिनंदनच्या प्रस्तावावेळी शिवसेना आणि शिंदे गटांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे पाहायला मिळाली. शिवसेना प्रतोद सुनील प्रभू ( Sunil Prabhu ) यांनी व्हीपचा संदर्भ देत शिंदे गटावर टीका केली. मात्र, शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी प्रभू यांना फटकारत अभिनंदनच्या प्रस्तावावर राजकीय फड नको, असा सल्ला दिला.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar

मुंबई - शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना आपल्यासोबत नेत मोठी बंडखोरी केली. भाजपच्या साथीने त्यांचे बंड यशस्वी झाले आणि मुख्यमंत्रपदाची माळ त्यांच्या गटात पडली. बंडखोरी झाल्यापासूनच शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार जुंपली आहे. राज्यात भाजपच्या मदतीने शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविले. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. भाजपचे राहुल नार्वेकर हे 164 विरुद्ध 107 अशा मतांच्या फरकाने निवडून आले. मात्र अभिनंदन प्रस्तावात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीपवरून शिंदे गटावर आगपाखड केली. त्यावरून शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी सुरेश प्रभू यांना फटकारले. अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर राजकीय फड सुरू करू नका, असे ते म्हणाले.

मुंख्यमंत्र्यांनी मांडला होता अभिनंदन प्रस्ताव - अध्यक्षपदासाठी उभे असलेले भाजपचे राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे साळवी यांना फक्त 107 मते मिळाली. नार्वेकरांच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मात्र, शिवसेनेने त्यावर आक्षेप घेतला आहे. एकूण 39 आमदारांनी शिवसेनेचा पक्षादेश डावलून मतदान केले. याची नोंद घेतली असून तशी तक्रार विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे सरकार किती काळ टिकेल असा प्रश्नचिन्ह शिवसेना सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले. अभिनंदननाच्या प्रस्तावरती व्हीपचे संदर्भ देऊन आरोप प्रत्यारोप करणे योग्य नाही. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. शिवाय आम्हाला कायदेशीर बाबी माहित आहेत. मात्र, त्यावर बोलण्याची ही वेळ नाही. आज केवळ अभिनंदनचा प्रस्ताव मांडला असून त्यावर सहयोगी आमदारांनी चर्चा करावी, असा सल्ला केसरकर दिला.

शिवसेना आणि शिंदे गटाने बजावले व्हीप - विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना विधिमंडळ पक्षाकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी बंडखोर चाळीस आमदारांना व्हीप बजावला होता. शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावे. पक्षादेश झुगारल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा प्रभू यांनी इशारा दिला होता. तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी 16 आमदारांना व्हीप बजावला होता. हे दोन्ही व्हीप विधानसभेने स्वीकारले असून ते राखून ठेवले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाचे गटनेते आणि प्रतोदचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. येत्या 11 जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे. यामुळे आज यावर निर्णय झाला नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालय सुनावणीवेळी कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis : विधानसभा अध्यक्षपदाचा पेपर सोप्पा, बहुमत चाचणीचं काय?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.