ETV Bharat / city

Deepak Kesarkar : 'भाजपसोबतचे त्यांचे जुने नाते पुन्हा जागृत करावे'; दीपक केसरकरांचा कळकळीचा सल्ला - Deepak Kesarkar accused Uddhav Thackeray

Deepak Kesarkar : पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तयारी होती, आम्ही जाऊन उद्धवजींना भेटायचे, आणि त्यांना सांगायचे की त्यांनी भाजपसोबतचे त्यांचे जुने नाते पुन्हा जागृत करावे, असा गौप्यस्फोट दिपक केसरकरांनी केला आहे.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar
author img

By

Published : Aug 6, 2022, 10:23 AM IST

मुंबई - राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाआघाडी स्थापन झाल्यानंतरही युतीबाबत चर्चा सुरू होत्या अशी स्पष्टोक्ती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गौप्यस्फोट केले आहे. तसेच, पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तयारी होती, आम्ही जाऊन उद्धवजींना भेटायचे, आणि त्यांना सांगायचे की त्यांनी भाजपसोबतचे त्यांचे जुने नाते पुन्हा जागृत करावे, असा गौप्यस्फोट दिपक केसरकरांनी केला आहे.

सुशांतसिंह प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा राणेंकडून डाव - महाराष्ट्रात ठाकरे आणि राणे वाद हा नवीन नाही आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर केल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शिंदे-भाजप सरकार स्थापन झालं. सत्ता स्थापन होताच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागलं. त्याला शिवसेनेकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं. त्यात आता शिंदे गटाते प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट राणे यांच्यावर आरोप करत आदित्य ठाकरेंचा बचाव केला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची राणेंनी बदनामी ( narayan rane defame aaditya thackeray ) केली, असा आरोप केसरकरांनी नारायण राणेंवर केला ( deepak kesarkar allegation narayan rane ) आहे.

'हे आरोप संपूर्ण खोटे' - आज जे काही बोलणार आहे, त्यावर कोणताही प्रश्न विचारू नका, अशी सुरुवात करत दीपक केसरकर यांनी सुशांत सिंह प्रकरणाला हात घातला. यावेळी झालेल्या आरोपांमध्ये आणि वस्तुस्थितीत जमीन आस्मानाचा फरक होता. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची राणेंनी बदनामी केली. भाजपच्या मुख्यालयातून त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. राणे यांच्या या आरोपांनंतर उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारे शिवसेनेतील माझ्यासारखे अनेक नेते दुखावले गेले. भाजपच्या नेत्यांना याबाबत विचारणा केली. नारायण राणे यांच्याकडून अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. मात्र, हे आरोप पूर्णपण खोटे होते, असे सांगत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली.

'राणेंना केंद्रात घेतलं, उद्धव ठाकरे...' - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर हा प्रकार घातला. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी माझे म्हणणे नीट ऐकून घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात डायलॉग सुरु झाला होता. हे दोन्ही मोठे नेते आणि रश्मी ठाकरेही होत्या. आम्ही या दोघांचे म्हणणे व्यवस्थितपर्यंत एकमेकांपर्यंत पोहोचवत होतो. या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे भूमिका निभावली. यावेळी पंतप्रधान मोदींना बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असणारा आदरही दिसून येत होता. मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते. परंतु, नंतर १२ आमदारांचे निलंबन झाले. राणेंना केंद्रात घेतले गेले. यामुळं उद्धव ठाकरे नाराज झाले. पुढे शिंदे गटाने वेगळा निर्माण घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवा, आपण एकत्र येवू. असे उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले. भाजप तयार झाली नाही, असे दीपक केसरकरांनी सांगितलं.

केसरकरांच्या संजय राऊतांना कानपिचक्या - पत्राचाळ ही बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील योजना होती. त्या योजनेत शिवसैनिकांचा हस्तक्षेप असणे चुकीचा आहे. तसेच, गरिबांना घर देण्यासाठी अशा प्रकारची कारवाई झाल्यास मनमानी करणाऱ्या बिल्डरांना चाप लागेल, अशा कानपिचक्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना दिल्या ( deepak kesarkar on sanjay raut ) आहेत.

हेही वाचा - Saamana Editor in Chief : उध्दव ठाकरे सामनाचे मुख्य संपादक होताच, अग्रलेखात शिंदे यांच्यावर सर्वात घणाघाती टीका

हेही वाचा - Shinde Government Cabinet Expansion : राज्यात मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे वर्ग, मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे सरकारची कसरत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.