ETV Bharat / city

Deepak Kesarkar on Kirit Somaiyas Statement : भाजपला दोष देणे योग्य नाही- दीपक केसरकरांनी स्पष्ट केली शिंदे गटाची भूमिका - Deepak Kesarkar on Uddhav Thackeray

सोमय्या यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रीया देत, शिंदे गटाचे पक्ष प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar on Uddhav Thackeray ) यांनी म्हणाले की, आम्ही आमचे कुटुंब सोडून आलेलो आहोत. पण आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल कोणी काही बोलू नये. आमच्या पक्षप्रमुखाबद्दल आम्हाला आदर आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर कोणीही टीका करायची नाही, असे आमचे भाजपसोबत ठरले होते. किरीट सोमय्या यांना हे माहीत नव्हते.

दीपक केसरकर
दीपक केसरकर
author img

By

Published : Jul 10, 2022, 1:13 PM IST

मुंबई - शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ( Eknath Shinde revolted ) राजकीय वाक्युद्ध सुरू झाले. हे वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजप नेते किरीट सोमैय्या ( BJP leader Kirit Somaiya ) सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान करत आहेत. शिवसेना यावरून आक्रमक झाली असताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ( Kirit Somaiya slammed Uddhav Thackeray ) उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माफिया असा केला होता. यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. आता शिंदे गट पुढे आला आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. शिवाय आमचे ते नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी खालच्या स्तराला जाऊन टीका करणार असेल तरी ती सहन केली जाणार नाही. त्यामुळे याबाबतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. तर लवकरच याबाबत भूमिका जाहीर केली जाईल. मात्र, एका व्यक्तीची भूमिका ही पक्षाची होऊ शकत नाही. त्यामुळे किरीट सोमैय्या यांच्या वक्तव्यामुळे भाजप पक्षाला दोष देणे हे योग्य नाही, असे केसरकर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमैय्या यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगितले आहे. भविष्यात ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलणार नाहीत, असे म्हणल्याचे केसरकर ( Shinde faction group spokesperson ) यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केली होती टीका- शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर संजय राऊत यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. बंडखोर आमदाराकडूनही पहिल्या दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर बंडखोरीचे खापर फोडले जात आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना, पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगणारे शरीराने शिवसेनेत तर मनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत, असा चिमटा काढला. तसेच निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन जनतेसमोर गेल्याची सांगत बंडखोरीचे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

शिवेसेनेतून बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांसह बंड करुन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत. मात्र भाजपा नेत्यांकडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर सतत टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 'माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन' असे ट्विट (displeasure on tweet )केले आहे. यानंतर शिदें गटात गेलेले शिवसेना आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा-Shinde group spokesperson Deepak Kesarkar : गद्दार म्हणताना दहा वेळा विचार करावा; आम्ही बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा मान ठेवतो - दीपक केसरकर

हेही वाचा- Deepak Kesarkar : किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दलचे 'ते' ट्विट दीपक केसरकरांना खटकले

हेही वाचा- Kirit Somaiya Controversial statement : उद्धव ठाकरेंवरील जळजळीत टीका किरीट सोमैय्यांना भोवण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.