मुंबई - मुंबईतील वरळी वांद्रे सागरी सेतूवर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती चेन्नईमध्ये सुरू असल्याबाबतचा गंभीर आरोप, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी तशा पद्धतीची वर्तमानपत्रात आलेली जाहिरातही दाखवली. एप्पको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ही भरती करण्यात येणार असून; ही भरती चेन्नईमध्ये का करण्यात येत आहे, असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विचारला होता. needs to be more mature.
आदित्य ठाकरे यांनी परिपक्व व्हावे : महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. याला उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, जर आपल्याला अनुभवी आणि प्रशिक्षित कामगार आणायचे असतील तर, अशी भरती केली तर काय बिघडले. कशी भरती केली जाते?, कोणाला नियुक्त केले जाते?, याबाबत आदित्य ठाकरे यांना काहीही माहिती नाही. त्यांनी आतापर्यंत अशा पद्धतीने कधीही भरती केलेली नाही. त्यामुळे त्यांचा अनुभव कच्चा आहे. त्यांनी कमी पावसाळे पाहिलेले आहेत. रोज उठून काहीतरी नवे आरोप करणे, एवढेच त्यांचे आता काम राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्त्व देत नाही. आदित्य ठाकरे यांनी अधिक परिपक्व होण्याची गरज आहे, असा टोलाही शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला.