मुंबई - लहान-थोरांचा उत्सवाचा सण असलेल्या गोपाळकाला अर्थात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी ( Public Holiday On Dahihandi Festival ) जाहीर करावी, दहीहंडीला राष्ट्रीय सण मान्यता मिळावी, अशी मागणी बंडखोर आमदार प्रताप सरनाईक ( Rebel MLA Pratap Sarnaik demand on Dahihandi ) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. गेल्या दहा वर्षांपासून आमदार सरनाईक ( Rebel MLA Pratap Sarnaik ) यांची मागणी असून यंदा मुख्यमंत्री शिंदे ती मान्य करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
मुंबईतील दहीहंडीचा उत्साह- मुंबई आणि लगतच्या शहरातील गोपाळकाला देशभरात प्रसिद्ध आहे. या दहीहंडीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी महिलांसह तरुण मंडळी आतुर असतात. दरवर्षी हा सण उत्सवात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे या सणावर विरजण पडले होते. पण आता परिस्थिती बदलल्याने तरुणांसह महिलावर्ग प्रचंड उत्साही आहेत.
धोरणात्मक निर्णय घ्या - दहीहंडी हा लोकप्रिय सण आहे. यंदा १९ ऑगस्टला गोपाळकाला आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळाल्यास सर्वांना उत्सवाचा आनंद लुटता येईल. मुंबई, ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर लहान शहरांमध्येही या उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातही हा सण लोकप्रिय झाला आहे. भारतात स्पेनसारख्या देशातून स्पर्धक भारतात येतात. मुंबई आणि ठाणेमध्ये गोपाळकाल्याच्या दिवशी जिल्हाधिकारी स्तरावर सुट्टी दिली जाते. राज्य सरकारने या सणाला राष्ट्रीय दर्जा देऊन सार्वजनिक सुट्टी देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी केली.
हेही वाचा - Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल