ETV Bharat / city

लोकल सुरू करण्याचा, निर्बंध हटवण्याचा निर्णय तज्ज्ञांशी बोलूनच - आदित्य ठाकरे - Aaditya Thackeray on mumbai lockdown

मुंबईमधील लोकल सुरू करणे किंवा निर्बंध हटवणे याबाबत जो काही निर्णय होईल तो आरोग्य विभागातील तज्ज्ञांशी बोलूनच होईल, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Aaditya Thackeray
मंत्री आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jun 19, 2021, 5:23 PM IST

मुंबई - मुंबईत सध्याही कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंधांची आवश्यकता आहे. मुंबईमधील लोकल सुरू करणे किंवा निर्बंध हटवणे याबाबत जो काही निर्णय होईल तो आरोग्य विभागातील तज्ज्ञांशी बोलूनच होईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

नागरिकांचा जीव वाचवणे हे पहिले कर्तव्य -

२५ वर्षाहून अधिक काळ सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्याही ५०० च्या खाली गेलेली नाही यामुळे तिसरी लाट टाळण्यासाठी निर्बंध आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. कोणताही निर्णय घेताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांचा जीव वाचवणे हे पहिले कर्तव्य आहे. यामुळे लोकल सुरु करण्याचा निर्णय असो किंवा निर्बंध कमी करण्याचा निर्णय असो टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पालिकेच्या परवानगीनेच लसीकरण करा -

कांदिवली येथे बनावट लसीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बोलताना लसीकरणावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही, यामुळे गोंधळ होईल. चौकशी अंती खरं खोटं समोर येईल. पालिलेकडून ना हरकत मिळाल्यावरच सोसायट्यांनी लसीकरण करावं अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे. तसेच जर कोणी दोषी आढळलं तर कारवाई केलीच जाणारच, असे ठाकरे म्हणाले.

नॉन कोविड काम सुरु होऊ दे -

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पालिका मुख्यलयात शिवसेनेचे नवीन दालन सुरु झाल आहे. येथे माजी महापौरांना बसण्यासाठी दालन ठेवण्यात आले आहेत. अशी दालने आणखी वाढू देत असे म्हणत शिवसेनेचे आणखी महापौर निवडणून आणा अशा सूचना नगरसेवकांना केल्या. सध्या सर्व नगरसेवक कोविडचे काम करत आहेत. त्या कामात सर्व व्यस्थ आहेत. लवकरच मुंबईमधील कोविड जाऊन नॉन कोविड काम सुरु होऊ दे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.