ETV Bharat / city

मुंबई सेंट्रलचे नामकरण लवकरच होणार नाना शंकर शेठ स्टेशन

पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव नाना शंकर शेठ करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात होती. याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी खासदार अरविंद सावंत यांना पत्र पाठवून, नाव बदलण्याबाबत सर्व यंत्रणांचे अहवाल आल्यावर केंद्र सरकार योग्य ती कार्यवाही करेल असे संगितले आहे.

author img

By

Published : Jan 6, 2021, 3:13 PM IST

Updated : Jan 7, 2021, 11:45 AM IST

मुंबई सेंट्रलचे नामकरण लवकरच होणार नाना शंकर शेठ स्टेशन
मुंबई सेंट्रलचे नामकरण लवकरच होणार नाना शंकर शेठ स्टेशन

मुंबई - पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव नाना शंकर शेठ करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात होती. याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी खासदार अरविंद सावंत यांना पत्र पाठवून, नाव बदलण्याबाबत सर्व यंत्रणांचे अहवाल आल्यावर केंद्र सरकार योग्य ती कार्यवाही करेल असे संगितले आहे.

शिवसेनेची मागणी

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव नाना शंकर शेठ करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात होती. याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्र लिहिले होते. या पत्राला उत्तर देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी खासदार अरविंद सावंत यांना पत्र पाठवले आहे. त्यात आपले पत्र मिळाले असून, इतर यंत्रणांचे अहवाल आल्यावर योग्य तो निर्णय घेऊ असे सावंत यांना कळवण्यात आले आहे.

'या' स्टेशनचे नाव बदलले

मुंबईमधील व्हिटी म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आले आहे. लोअर परेल स्टेशनचे नाव प्रभादेवी असे करण्यात आले आहे. आता मुंबई सेंट्रलचे नाव नाना शंकर शेठ असे करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

कोण होते नाना शंकर शेठ ?

नाना शंकर शेठ यांचे नाव जगन्नाथ शंकर शेठ असे आहे. त्यांचे मुंबईच्या जडण घडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांनी भारतातील पहिली रेल्वे कंपनी असलेल्या ग्रेट ईस्टर्न रेल्वेमध्ये गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्यांना भारतीय रेल्वेचे जनक असे संबोधण्यात येते.

हेही वाचा -'औरंगाबाद नामांतर प्रकरणी भाजपाने शिवसेनेला प्रश्न विचारूच नये'

हेही वाचा -...तर पहिल्याच दिवशी औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करु - चंद्रकांत पाटील

हेही वाचा - नामांतर वाद : असा आहे औरंगाबाद शहराचा नाव बदलण्याचा इतिहास

हेही वाचा - 'संभाजीनगर' ला काँग्रेसचा पाठिंबा नाहीच; बाळासाहेब थोरातांनी मांडली काँग्रेसची भूमिका

हेही वाचा - औरंगाबादच्या नामांतरावरून प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका

Last Updated : Jan 7, 2021, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.