मुंबई - राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० दिवस वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात (casual leave of police from 12 to 20 days) आला. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलिसांच्या रजांची मागणी लावून धरली (decision of state cabinet) होती.
पोलीसांना सणावाराला देखील रजा नाही - राज्यातील पोलीसांवर कामाचा ताण असतो. सणवाराला रजादेखील मिळत नाही. कामाचा वेळही अधिक असतो. पोलिसांना रजा वाढवून देण्यासाठी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सातत्याने प्रयत्नशील होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या संदर्भातील प्रस्तावाला हिरवा कंदील दिला होता. प्रशासनाने यावर अभिप्राय मागवल्यानंतर राज्यातील सरकार बदलले. त्यामुळे हा प्रस्ताव रखडला होता. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी रजा वाढीला आजच्या बैठकीत मंजुरी (state cabinet to extend casual leave of police) दिली.
पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक वर्षात १२ ऐवजी ८ रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर केल्या होत्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात (Casual Leave Extend) आली.
पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी - राज्यात ७५ हजार पोलीसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली होती. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावे, तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिले. सध्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु आहे. भरतीच्या वेळी लेखी परिक्षेच्या अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येईल. मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करावी. मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा. तसेच कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.