ETV Bharat / city

Maharashtra Omicron Variant : दिलासादायक...आज राज्यात ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही ! - ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याने काहीसा दिलासा

राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १० ( Omicron 10 patients ) रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

Omicron Variant
Omicron Variant
author img

By

Published : Dec 8, 2021, 10:33 PM IST

Updated : Dec 8, 2021, 10:38 PM IST

मुंबई - जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron Patients ) आढळून येत आहेत. राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १० ( Omicron 10 patients ) रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून ( Health Department ) करण्यात आले आहे.

शासनाचे प्रसिद्धी पत्रक
शासनाचे प्रसिद्धी पत्रक
  • आतापार्यंत १० प्रवासी ओमायक्रॉन बाधित

राज्यात अति जोखमीच्या देशातून ७९३० तर इतर देशातून ३८ हजार ६६० असे एकूण ४६ हजार ५९० प्रवासी राज्यात आले. त्यापैकी अति जोखमीच्या देशातील ७९३० तर इतर देशातील ९९५ अशा एकूण ८ हजर ९२५ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून अति जोखमीच्या देशातून आलेले ९ तर इतर देशातून आलेले २ अशा एकूण ११ प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १० प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. १ नोव्हेंबरपासून विमानतळावर आलेल्या व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६४ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ५२ जणांचा अहवाल अद्याप बाकी आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

  • 'नागरिकांनी भीती बाळगू नये'

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत. त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

हेही वाचा - Corona Update - राज्यात कोरोनाचे 893 नवे रुग्ण, 10 रुग्णांचा मृत्यू

Last Updated : Dec 8, 2021, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.