ETV Bharat / city

मुंबईत पावसाळी आजारामुळे मृत्यूचा आकडा घटला - आरोग्य विभाग मुंबई

२०१६ ते २०१९ या गेल्या चार वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये पावसाळी आजाराने मृत्यूंची संख्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

पावसाळी आजारामुळे मृत्यूचा आकडा घटला
पावसाळी आजारामुळे मृत्यूचा आकडा घटला
author img

By

Published : Jan 2, 2021, 10:39 PM IST

मुंबई - मुंबईत पावसाळी आजाराने दरवर्षी काही रुग्णांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये मलेरिया, डेंगू, लेप्टो या पावसाळी आजाराने १२ जणांचा मृत्यू झाला. २०१६ ते २०१९ या गेल्या चार वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये पावसाळी आजाराने मृत्यूंची संख्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. तर २०१९ मध्ये मलेरियामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

२०२० मध्ये १२ जणांचा मृत्यू -

मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. कोरोनाचा वाढता प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने घरोघरी जावून मुंबईकरांच्या आरोग्य तपासणीवर भर दिला. तसेच ठोस उपाययोजना राबवल्या. यामुळे सध्या मुंबईत कोरोना आटोक्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग असतानाच मलेरिया, गॅस्ट्रो, हेपेटायसिस, डेंगू, आदी साथीचे आजारही मुंबईकरांना झाले आहेत. २०२० मध्ये मलेरियाचे ४९४८ रुग्ण आढळून आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. लेप्टोच्या २४० रुग्णांपैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूच्या १२८ रुग्णांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये पावसाळी आजाराने एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये मृत्यू नाही -

मुंबईत दरवर्षी विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. परिणामी अनेकजण दगावतात. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात मलेरियाचे ५४९, लेप्टोचे २४, डेंगूचे ४८, गॅस्ट्रोचे ७००, हिपॅटायटीसचे ५२, एच१एन१चे केवळ ३ रुग्ण आढळून आले. या कालावधीत एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे महापालिका मुख्य आरोग्य कार्यकारी मंगला गोमारे यांनी सांगितले.

२०२९ मध्ये मलेरियाने मृत्यू नाही -

२०१६ मध्ये मलेरियाचे १२, २०१७ मध्ये ६,२०१८ मध्ये ३ तर २०२० मध्ये १ मृत्यू झाला. मात्र २०१९ मध्ये मलेरियाचे ४३५७ रुग्ण सापडले. त्यावर्षात एकही रुग्ण मलेरियामुळे दगावला नसल्याचे मंगला गोमारे यांनी सांगितले.

मृत्यूचा आकडा घटला -

२०१६ मध्ये मलेरियाने १२, लेप्टोने ९, डेंगूने ७ तर हेपटायसिस २ अशा एकूण ३० जणांचा मृत्यू झाला होता.

२०१७ मध्ये मलेरियाने ६, लेप्टोने ७, डेंगूने १७ हेपटायसिस २ तर एच१ एन १ ने १८ अशा एकूण ५० जणांचा मृत्यू झाला होता.

२०१८ मध्ये मलेरियाने ३, लेप्टोने १२, डेंगूने १४ अशा एकूण २९ जणांचा मृत्यू झाला होता.

२०१९ मध्ये लेप्टोने ११, डेंगूने ३, हेपटायसिस १ तर एच१ एन १ ने ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला होता.

२०२० मध्ये मलेरियाने १, लेप्टोने ८, डेंगूने ३ अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला सरकारची मंजूरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.