ETV Bharat / city

Threaten To Join Shinde Group: शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव, माजी नगरसेवकाकडून कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येचा इशारा

author img

By

Published : Oct 1, 2022, 9:36 PM IST

Updated : Oct 2, 2022, 12:37 PM IST

आपल्या तसेच आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी डिसीपी विवेक पानसरे, संदीप नाईक, विजय चौगुले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असे मढवी यांनी म्हटले आहे. पानसरेंविरोधात आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे देखील मढवी Threaten To Join Shinde Group म्हणाले.

DCP Vivek Pansare Threaten To Encounter Ex Shiv Sena Corporator M K Madhavi To Join CM Eknath Shinde Group in Navi Mumbai
'शिंदे गटात न आल्यास एन्काउंटर करेन'.. डीसीपींची शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी

नवी मुंबई - परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे DCP Vivek Pansare हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात CM Eknath Shinde Group सामील होण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असून, 10 लाखाची खंडणी मागत असल्याचा तसेच एन्काउंटर करण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप माजी शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी Ex Shivsena Corporator M K Madhavi यांनी केला आहे.

मढवी यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. मढवी यांच्या या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शहर प्रमुख विजय माने, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे आणि एम. के. मढवी यांच्या पत्नी विनया मढवी यांच्यासह नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, माझ्यावर वेगवेगळे गुन्हे नोंदवले जात असून, माझ्या विरोधात महिलांना पुढे करत विनयभंगाच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. 20 जूनपासून हा सगळा त्रास मला व माझ्या कुटुंबाला दिला जात आहे. पानसरे मला विजय चौगुलेंच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव टाकत असून, हे सगळे सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. मात्र मी उद्धव साहेबांची शिवसेना सोडणार नाही. हा सगळा त्रास असाच सुरू राहिला तर डिसीपी पानसरेंच्या ऑफिससमोर मी व माझे कुटुंब सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा मढवी यांनी दिला आहे.

आपल्या तसेच आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी डिसीपी विवेक पानसरे, संदीप नाईक, विजय चौगुले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असे मढवी यांनी म्हटले आहे. पानसरेंविरोधात आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे देखील मढवी म्हणाले.

पानसरे म्हणाले, आरोप खोटे : डीसीपी विवेक पानसरे यांनी मात्र मढवी यांचे आरोप फेटाळले असून, हद्दपारीच्या भीतीपोटी मढवी बेछूट आरोप करत असल्याचे म्हटले आहे. मढवी यांच्यावर दखल आणि अदखलपात्र असे मिळून 13 गुन्हे दाखल असून त्यांच्या तडीपारीची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली : ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी एम. के. मढवी धमकी प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. राज्यात सध्या बीन पैशाचा तमाशा सुरू आहे. राज्यासमोर महागाई, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय आकसापोटी शिवसैनिकांना धमक्या देण्यात, त्यांची झुणका भाकर केंद्र, पोळी भाजी केंद्र बंद पाडण्यात व्यस्त असून, शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे खासदार म्हणाले. मढवी कुटुंब लोकांची कामे करतात म्हणून त्यांना नगरसेवकपदाच्या दोन तीन टर्म मिळाल्या असल्याचे सांगत, शिवसेना मढवी कुटुंबियांच्या पाठीमागे असल्याचे खासदार म्हणाले. मढवी धमकी प्रकरण हे गंभीर असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते बदनाम होणार नाही याची काळजी घ्यावी, असे देखील खासदार विचारे यांनी म्हटले आहे.

Last Updated : Oct 2, 2022, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.