ETV Bharat / city

Devendra Fadnavis उद्धव ठाकरेंनी केलेला भ्रष्टाचार मुंबईकरांसमोर मांडा, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा - देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी केलेला भ्रष्टाचार मुंबईकरांच्या समोर मांडा पालिकेला भ्रष्टाचार विळखा पडला आहे काही कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत ही कामे या लोकांची दुभती गाय आहे असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी साधला dcm devendra fadnavis criticized uddhav thackeray आहे

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
author img

By

Published : Aug 20, 2022, 3:52 PM IST

Updated : Aug 20, 2022, 4:09 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा पडला आहे. सामान्य नागरिकांचा पैसा काही लोकांच्या तिजोरीत गेला आहे. हे सर्व बदलण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेवर mumbai corporation election 2022 शिवसेना भाजपा युतीचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा. भाजपाने केलेली कामे आणि उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी केलेला भ्रष्टाचार मुंबईकरांच्या समोर मांडा, असे स्पष्ट आदेश उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले आहेत. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचेही फडणवीसांना नमूद केलं dcm devendra fadnavis criticized uddhav thackeray आहे.

निवडणुकीचे रणशिंग फुंकले - आमदार आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, मंगलप्रभात लोढा हे राज्यात मंत्री झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या दोघांचा सत्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनमुखानंद हॉल, माटुंगा येथे करण्यात आला. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महापालिका निवडणुकीचे फडणवीस यांनी रणशिंग फुंकले.

'महापालिकेवर भगवा फडकवा' - यावेळी फडणवीस यांनी म्हटलं, पालिकेला भ्रष्टाचार विळखा पडला आहे. काही कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत. ही कामे या लोकांची दुभती गाय आहे. या लोकांनी कोरोनात ही कोट्यवधी रुपये खाऊन टाकले. मुंबईचे सौदर्यकरण केलं असे सांगतात. मग पिण्याच्या पाण्याची समस्या यांनी का सोडवली नाही. मुंबई ही एका परिवाराची, घराण्याची ठेवायची नाही. मुंबईकर लोकांकडे पाहणारे, त्यांचे प्रश्न सोडविणारे लोक निवडून द्यायचे आहेत पक्षाने महापालिकेची मोहिम फत्ते करायला आशिष शेलार यांच्या रूपाने बिनीचा शिलेदार निवडला आहे. त्यांच्या नेतृत्वात महापालिकेवर भगवा फडकवा, असे आदेश फडणवीस यांनी दिले.

'मुंबईकरांच्या कोर्टात खटला' - शेवटच्या माणसाचा विकास हाच आपला ध्यास आहे. आपलं सरकार आहे. आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि मी स्वतः वकील आहोत. आपण आता मुंबईमधील समस्यांचा आरोपी कोण? हा खटला मुंबईकरांच्या कोर्टात लढायचा आहे. मुंबईकर त्यावर न्याय करतील. मागच्या वेळेपेक्षा जास्त संख्येने नगरसेवक निवडूण आणुया, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

'मुख्यमंत्री घरी बसणार नाही, आणि तुम्हालाही घरी बसायला...' - आपले सरकार आले असल्याने आता सर्व सण जोरात होणार आहेत. मुख्यमंत्री घरी बसणार नाही, आणि तुम्हालाही घरी बसायला देणार नाही. निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबई तोडू देणार नाही, मुंबई दिल्ली समोर झुकणार नाही, मराठी माणसाला विस्थापित करू देणार नाही, असे डायलॉग बोलले जातील. असं काही होणार नसल्याने हे डायलॉग तरी बदला, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मराठी माणूस तुमच्या मुळे मुंबईच्या बाहेर गेला. तुम्ही कधी दिल्लीला गेला नाहीत. गेलात ते फक्त सोनिया गांधी यांच्या पुढे झुकलात. मुंबई कधीही दिल्लीपुढे झुकणार नाही. मात्र, मुंबईच्या हितासाठी दिल्लीला जाऊन मान्यता मिळवून आणू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - Ajit pawar on reservation to govinda मग स्पर्धा परीक्षा देणारे काय करणार, गोविंदांना आरक्षणावर अजित पवारांचा सवाल

Last Updated : Aug 20, 2022, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.