ETV Bharat / city

Dangerous Building In Mumbai: बांद्रामध्ये घर कोसळून एक ठार, मुंबईत ३३७ अतिधोकादायक इमारती - House Collapse One Killed

गुरुवारी मध्यरात्री बांद्रा येथील एक दुमसाजली घर कोसळून एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईमधील ( Mumbai ) धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईमध्ये सी-१ श्रेणीतील म्हणजेच अतिधोकादायक व मोडकळीस ( Dangerous Buildings ) आलेल्या ३३७ इमारती आहेत.

Dangerous Buildings
धोदादायक इमारती
author img

By

Published : Jun 9, 2022, 3:09 PM IST

Updated : Jun 9, 2022, 3:39 PM IST

मुंबई - बांद्र्यात घर कोसळून एकाचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील ( Mumbai ) धोकादायक इमारतींचा ( Dangerous Buildings ) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईमध्ये सी-१ श्रेणीतील म्हणजेच अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या ३३७ इमारती आहेत. या ३३७ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ७०, पूर्व उपनगरे विभागात १०४ तर पश्चिम उपनगरे विभागात १६३ इमारती आहेत. सर्वाधिक धोकादायक इमारती या पश्चिम उपनगरात आहेत. धोकादायक इमारतींपैकी १०२ इमारतींचे लाईट पाणी कापले ( Water Cut Off )आहे. तर १०९ रिकाम्या केल्या आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून प्रतिनिधीने घेतलेला आढावा

...तर इमारती खाली करा - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून गाळ काढणे, रस्ते दुरुस्ती यांच्यासोबतच मुंबई महानगरातील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करून त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. यंदादेखील महानगरपालिकेने निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. तपासणीअंती २५ एप्रिल रोजी सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in वर ‘इतर संकेतस्थळं / Relevant Websites’ या सदरामध्ये ही यादी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या इमारती ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरीता वापरात आहेत, अशा इमारतींची महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदणीकृत असलेल्या संरचनात्मक अभियंत्यांद्वारे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. या अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱया रहिवाशांनी नागरिकांनी त्वरित निवासस्थान रिक्त करावे, तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे तसेच सदर इमारत स्वतःहून मालकांनी निष्कासित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६ , २२६९४७२५ , २२६९४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची हानी टाळण्याच्या दृष्टीने जागरुक राहणे, ही नागरिकांची देखील जबाबदारी असून त्या कामी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार आणि उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) चंदा जाधव यांनी केले आहे.

Dangerous Buildings
धोदादायक इमारती

पश्चिम उपनगरात सर्वाधिक धोकादायक इमारती - मुंबई शहर विभागात ७० इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या ७० इमारतींमध्ये ए विभाग ४, बी विभाग ४, सी विभाग १, डी विभाग ४, ई विभाग १२, एफ/दक्षिण विभाग ५, एफ/उत्तर विभाग २६, जी/दक्षिण विभाग ४ आणि जी/उत्तर विभाग १० अशा विभागनिहाय इमारतींचा समावेश आहे. पश्चिम उपनगरांमधील १६३ पैकी एच/पूर्व विभागात ९, एच/पश्चिममध्ये ३०, के/पूर्व विभागात २८, के/पश्चिम विभागात ४०, पी/दक्षिण विभागामध्ये ३, पी/उत्तर विभागात १३, आर/दक्षिण विभागात १०, आर/मध्य विभागामध्ये २२ आणि आर/उत्तर विभागात ८ इमारती सी-१ श्रेणीमध्ये आहेत. तर पूर्व उपनगरातील १०४ इमारतींपैकी एम/पश्चिम विभागात १६, एम/पूर्व विभागामध्ये १, एल विभागात १२, एन विभागात २०, एस विभागात ६ आणि टी विभागात ४९ इमारतींचा समावेश आहे.

109 इमारती केल्या रिकाम्या -
मुंबईमधील ३३७ धोकादायक इमारती पैकी १०२ इमारतींचे लाईट पाणी कापले आहे. तर १०९ रिकाम्या केल्या आहेत. काही इमारती मधील नागरिक कोर्टात गेल्याने त्या इमारती खाली करता येत नाहीत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे आजही हजारो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत.

अतिधोकादायक इमारत कशी ओळखाल

  • इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे.
  • इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे.
  • इमारतीचा तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे.
  • इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे.
  • इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.
  • इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे.
  • इमारतीचा आर.सी.सी. चेंबर्स (कॉलम, बीम) व विटांची भिंत यात सांधा / भेगा दिसणे.
  • स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.
  • इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे.

६ वर्षात ११६६ जणांचा मृत्यू - आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३०६६ जण जखमी झाले आहेत. १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३१५० दुर्घटना घडल्या. यांत १७९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर ७२२ जण जखमी झाले. २०१३ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये ११६६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

हेही वाचा - Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपद निवडणूक.. आज जाहीर होणार तारीख.. 'अशी' आहे निवडीची प्रक्रिया

Last Updated : Jun 9, 2022, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.