मुंबई - कोरोना काळात बंदी असतानाही अनधिकृतपणे डान्सबार चालवणाऱ्या डान्सबारवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या पथकाने गोरेगाव परिसरातील या डान्सबारवर कारवाई केली.
![dance bar seized in goregaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-10-dans-bar-7201159_10102020102715_1010f_1602305835_899.jpg)
गोरेगावमधील स्टार बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी अनधिकृतपणे डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांना 11 बारगर्ल नाचताना आढळल्या. या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी 11 बारबालांची सुटका केली असून हॉटेलचे वेटर, सुपरवायझर, कॅशियर आणि 15 ग्राहक अशा 19 जणांना अटक केली आहे.