मुंबई - विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असताना कलम ३७० वरुन राष्ट्रवादाचे श्रेय घेण्यासाठी शहरात अमित शाहंची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी रोजंदार मजूरांना येथे आणण्यात आले आहे. मात्र, या मजूरांशी चर्चा केली असता त्यांना भाजप, अमित शाह, राष्ट्रवाद आणि जम्मू काश्मीर बद्दल काहीच माहित नसून रविवारचा रोज भरुन काढण्यासाठी हे लोक येथे आल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. कलम ३७० संदर्भात गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, सभेसाठी मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणि गोरेगाव परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा परराष्ट्र अध्यक्षांच्या धर्तीवर संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावर १००-१०० मीटर अंतरावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. मात्र, या सभेला गर्दी जमवण्यासाठी रोजंदार मजूरांना या ठिकाणी आणण्यात आले. मात्र, या मजुरांशी बातचीत केली असता या लाोकांना भाजप, अमित शाह, राष्ट्रवाद आणि जम्मू कश्मीर बद्दल काहीच माहिती नसून रविवारचा रोज भरुन काढण्यासाठी हे लोक येथे आल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - टीका करणे विरोधकांना शोभते, सत्ताधाऱ्यांना नाही; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांची आघाडी ठरली असून जागावाटपाचा तिढाही सुटल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये आद्यपही जागावाटपाच्या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेकडून ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला समोर केला जात आहे. तर भाजप एवढ्या जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे पुढाकार घेणार होते. परंतु ही चर्चा फिस्कटल्याचं वृत्त आहे. कश्मीर ३७० मुद्दा भाजप विधानसभेचा मुद्दा करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या सभेत स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राष्ट्रवादाला मुंबईतील सभेतून फोडणी देणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यासाठी सामदाम दंड भेद वापरण्यास भाजपची तयारी असल्याचेही मुंबईतील सभेच्या तयारीवरुन स्पष्ट होत आहे.
हेही वाचा - भाजप मित्रपक्ष जिंकणार 220 जागा; अतुल भातखळकर यांचा विश्वास