ETV Bharat / city

Don Chhota Rajan Hearing : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हॉटेल व्यावसायिक हत्या प्रकरणातून दोषमुक्त

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दहिसर हॉटेल व्यावसायिक हत्या प्रकरणामधून दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र मकोका न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

छोटा राजन
छोटा राजन
author img

By

Published : Feb 11, 2022, 9:48 PM IST

Updated : Feb 11, 2022, 11:03 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दहिसर हॉटेल व्यावसायिक हत्या प्रकरणामधून दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र मकोका न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 30 ऑक्टोबर 1999 रोजी दहिसर रावल पाडा जंक्शनजवळ हॉटेल व्यावसायिक नारायण वेंकट पुजारीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा आज (शुक्रवारी) सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. सत्र न्यायालय न्यायमूर्ती ए टी वानखेडे यांनी या प्रकरणातून छोटा राजनवर करण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्याने दोषमुक्त करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती छोटा राजनचे वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे.

25 नोव्हेंबर 2015 ला इंडोनेशियातील बालीत छोटा राजनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 27 वर्ष भारतीय तपासयंत्रणेला गुंगारा देणाऱ्या राजनला 6 नोव्हेंबर 2015 ला भारतात आणले होते. भारतात आणल्यापासून राजन विरोधातील सर्व खटले हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. तसेच राजन हा फरार होऊन बनावट नाव आणि पासपोर्टवर अनेक वर्ष चकवा देत होता. खरी ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून राजन विरोधात विविध न्यायालयात खंडणी, हत्या यासारखे अनेक प्रलंबित खटल्यावर सुनवणी सुरू आहे. काही खटल्यात त्याला दोषी तर काहींमध्ये मुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा - Gang Rape On Minor Girl Nagpur : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार; नराधमांचा शोध सुरु

Last Updated : Feb 11, 2022, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.